Teachers day special; शाळेत रचला पाया, व्यवसायातही सर रचतायेत मार्गदर्शनाची वीट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 11:21 AM2020-09-05T11:21:59+5:302020-09-05T11:27:23+5:30

सुनील फुरडे म्हणतात; त्या काळात तळमळीने शिकविणारे शिक्षक, शेतकºयाच्या मुलाला यशाचा मार्ग दाखविणारे गुरूजनच !

The foundation laid in school, the foundation of guidance in business too! | Teachers day special; शाळेत रचला पाया, व्यवसायातही सर रचतायेत मार्गदर्शनाची वीट !

Teachers day special; शाळेत रचला पाया, व्यवसायातही सर रचतायेत मार्गदर्शनाची वीट !

googlenewsNext
ठळक मुद्देपहिलीपासून ते पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण देणारे अनेक शिक्षक आहेतशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच माझे जीवन घडलेमाझे आयुष्य उज्ज्वल करणाºया सर्वांचेच शिक्षकदिनी स्मरण होते

राजकुमार सारोळे 

सोलापूर : मी शेतकºयाचा मुलगा. ३५ वर्षांपूर्वी राज्यात फक्त  ७ सरकारी इंजिनिअरिंग कॉलेज होते. या कॉलेजला प्रवेशासाठी चांगले मार्क्स आवश्यक होते. इंजिनिअर होण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले ते केवळ गुरूजनामुळेच.. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुनील फुरडे यांच्या या भावना.

धोत्रे सरांमुळे आयुष्याला आकार
बार्शीतील जगदाळेमामा कॉलेजमध्ये बारावीपर्यंत शिक्षण झाले. बारावीनंतर इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश मिळविण्यासाठी चांगले मार्ग मिळविणे गरजेचे होते. यासाठी प्रा. शशिकांत धोत्रे सरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. ज्ञानदान हे पवित्र कार्य आहे, असे मानून ते तळमळीने सर्व विद्यार्थ्यांना शिकवायचे. त्यांच्या प्रेरणेने आयुष्याला आकार मिळाला.

शालेय व महाविद्यालयीन जीवनात मला अनेक गुरू भेटले. यात प्रत्येकाचे स्थान मोलाचे आहे. पण प्रा. शशिकांत धोत्रे यांनी टर्निंग पॉइंटवर असताना जीवन घडविले. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असलेला स्पार्क ओळखून ते मार्गदर्शन करायचे. शिस्त आणि टापटीपपणा असायचा. त्यामुळे कॉलेजला वेळेत हजर राहणे गरजेचे असायचे.  परीक्षेत नेमके काय विचारले जाते यावर त्यांचा जादा भर असायचा. इंजिनिअरिंग म्हणजे बांधकाम, रस्ते असेच काम असे आम्ही समजायचो. पण वर्गात ते काटेकोरपणे सगळ्या गोष्टी तळमळीने समजावून सांगायचे. त्यामुळे त्यांचा प्रभाव राहिला.

आज व्यवसायात असलो तरी मार्गदर्शन...
इंजिनिअर व्हायचे माझे स्वप्न धोत्रे सरांमुळे पूर्ण झाले. पदवी मिळाल्यानंतर बाळे येथील कॉलेजमध्ये सात वर्षे लेक्चरर, विभागप्रमुख व प्राचार्य म्हणून काम केले.  त्यानंतर बाहेर पडून बांधकाम व्यवसायात प्रवेश केला. आज अनेक लोक मार्गदर्शन घेण्यासाठी येतात. आलेल्या लोकांनी सर म्हटले की, मला धोत्रे सरांच्या शिकवणीची आठवण येते. बांधकाम व्यवसायात असलो तरी कार्यालयात येऊन धोत्रे सर मला नेहमी मार्गदर्शन करतात. 

धोत्रे सर प्लॉटवर आले
बारावीत ९२ टक्के मार्क मिळाल्यानंतर कºहाड कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. मी इंजिनिअर झालो. बाळे येथे साडेसात वर्षे ज्ञानदानाचे काम केले व त्यानंतर बांधकाम क्षेत्रात उतरलो. येथेही त्यांचे मार्गदर्शन राहिले. गतवर्षी बाळे येथे सुरू असलेले काम पाहण्यास गेलो तर तेथे आधीच धोत्रे सर आले होते. 

पहिलीपासून ते पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण देणारे अनेक शिक्षक आहेत. या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच माझे जीवन घडले. माझे आयुष्य उज्ज्वल करणाºया सर्वांचेच शिक्षकदिनी स्मरण होते.  

- सुनील फुरडे

Web Title: The foundation laid in school, the foundation of guidance in business too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.