देशद्रोहाच्या गुन्ह्यातील सोलापूरच्या चार आरोपींना आठ वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयातून जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 06:09 PM2021-09-08T18:09:00+5:302021-09-08T18:10:01+5:30

जमियत उलमा-ए-हिंदचे प्रदेश अध्यक्ष मौलाना नदिम सिध्दीकी व हासिफ नदाफ यांची माहिती

Four accused from Solapur on treason charges granted bail by Supreme Court after eight years | देशद्रोहाच्या गुन्ह्यातील सोलापूरच्या चार आरोपींना आठ वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयातून जामीन

देशद्रोहाच्या गुन्ह्यातील सोलापूरच्या चार आरोपींना आठ वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयातून जामीन

googlenewsNext

सोलापूर : देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेल्या सोलापूरच्या सादिक अब्दुल वाहब (रा. मुस्लिम पाच्छा पेठ, सोलापूर),

ईरफान मुछाले (रा. विजय नगर, सोलापूर), मोहम्मद उमर दंडोती (रा. कर्णिक नगर, सोलापुर) व इस्माईल लाल अहमद ( रा. विडी घरकुल, कुंभारी) या चार आरोपींना आठ वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाल्याची माहिती जमियत उलमा-ए-हिंदचे प्रदेश अध्यक्ष मौलाना नदिम सिध्दीकी यांनी पत्रकार परिषद दिली.

सादिक अब्दुल वाहब, ईरफान मुछाले, मोहम्मद उमर दंडोती, इस्माईल लाल अहमद या चौघांना मध्य प्रदेशातील भोपाल येथे २०१४ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर फायरिंग करणे, देशद्रोही कृत्य करणे, देशाच्या विरोधात युद्ध पुकारणे, प्रतिबधित संघटने बरोबर कार्य करणे, दहशतवादी हलचाली करणे असे गुन्हे दाखल होते.

याप्रकरणी एकूण दोन केस त्यांच्यावर होते. यातील केस नंबर ५०२ मध्ये एन.आय.ए.कोर्टाने संशयित आरोपींना निर्दोष ठरवले होते. पण केस नं. ५४१ अंतर्गत त्यांच्यावर केस चालू होती. या प्रकरणी भोपाळ कोर्टाने जामिन नाकारला व जबलपूर हायकोर्टाने ही जामिन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर जमियत उलमा-ए-हिंद संघटनेने सुप्रिम कोर्टात अपील दाखल केले. सुप्रिम कोर्टाचे वरिष्ठ वकिल अँड. राजिव धवन यांनी सदर केसवर कायदेशीर बाजू मांडली. केस क्रमांक ५४१ अंतर्गत आज सुप्रिम कोर्टाने जामिन मंजूर केला. अशी माहिती जमियत उलमा-ए-हिंदचे प्रदेश अध्यक्ष मौलाना नदिम सिध्दीकी व हासिफ नदाफ यांनी दिली.

Web Title: Four accused from Solapur on treason charges granted bail by Supreme Court after eight years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.