नागेश गाढवे खून प्रकरणी चार फरार आरोपींना अटक

By Admin | Published: June 16, 2014 01:19 AM2014-06-16T01:19:35+5:302014-06-16T01:19:35+5:30

सूत्रधारांच्या अटकेसाठी तहसीलवर मोर्चा

Four arrested absconding accused in Nagesh asshole murder case | नागेश गाढवे खून प्रकरणी चार फरार आरोपींना अटक

नागेश गाढवे खून प्रकरणी चार फरार आरोपींना अटक

googlenewsNext


बार्शी : येथील आझाद चौकात नागेश गाढवे या युवकाच्या खुनामधील मुख्य सूत्रधारांना, फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी गाढवे कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवारांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले़ दरम्यान मोर्चादिवशीच फरार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे़
शनिवार, दि. ३१ मे रोजी नागेश गाढवे याचा तावडी हद्दीत गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी सोमनाथ गाढवे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिनेश कोरे या युवकास ताब्यात घेऊन अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासात प्रशांत उर्फ प्रवीण नवनाथ रिकिबे, अमोल संजय मोहिते व नितीन पंडित माने या तिघा संशयितांना रविवारी रात्री अटक केली. या आरोपींना न्यायालयाने दि.१३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती़ तसेच त्यानंतर पोलीस तपासात गणेश पिसे, दत्ता तौर, बबलू शेट्टी व पांडू उर्फ विक्रम पवार (सर्व रा़ बार्शी) यांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने यांनाही आरोपी करुन अटक करण्यात आले आहे. या चार जणांना आज दि़ १५ रोजी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना २० जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ आझाद चौकातून निघालेला हा मोर्चा घोषणा देत तहसील कार्यालयावर आला, त्याठिकाणी नायब तहसीलदार यु़बी़ पवार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़
-------------------------------------------
आईची न्यायासाठी आर्त हाक
माझा मुलगा नागेश हा आमच्या कुटुंबाचा एकुलता एक आधार होता़ त्याच्या जाण्याने आमचा आधारच नाहीसा झाला आहे़ पिसे कुटुंबीयच या खुनामागील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप करत तशा आशयाचे निवेदन तहसीलदारांना देऊन या सर्वांना अटक करण्याची मागणी करुन गुन्ह्याचा तपास योग्य दिशेने करुन आम्हाला न्याय द्यावा अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा अनिता गाढवे यांनी दिला आहे़

Web Title: Four arrested absconding accused in Nagesh asshole murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.