जलजीवन मिशनअंतर्गत करमाळा तालुक्यासाठी चार कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:24 AM2021-09-26T04:24:23+5:302021-09-26T04:24:23+5:30
यामध्ये चिखलठाण नंबर १ व २ या गावांसाठी १ कोटी ९८ लाख ७६६ रुपये तसेच वांगी नंबर १ व ...
यामध्ये चिखलठाण नंबर १ व २ या गावांसाठी १ कोटी ९८ लाख ७६६ रुपये तसेच वांगी नंबर १ व २ या गावांसाठी १ कोटी ८६ लाख ८९ रुपये अशी तरतूद केली आहे. या निधीमधून संबंधित गावांत विहीर ते गाव अशी पाइपलाइन, गावांतर्गत पाइपलाइन, पाण्याची टाकी, जलशुद्धीकरण केंद्र इत्यादी कामे केली जाणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत हा निधी मंजूर झाला असून, यामध्ये १० टक्के लोकनिधी संबंधित गावाने भरणे अपेक्षित आहे. उर्वरित ५० टक्के रक्कम केंद्र शासनाकडून व राज्य शासनाकडून ५० टक्के दिली जाणार आहे.
-----