वाळु चोरीला मदत करणाºया सोलापूर जिल्ह्यातील २६ शेतकºयांच्या उताºयावर चार कोटींचा बोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 01:17 PM2018-09-14T13:17:57+5:302018-09-14T13:22:21+5:30

२६ शेतकºयांच्या सात-बारा उताºयावर महसूल विभागाने ४ कोटी ९ लाख ५० हजार ४९८ रुपयांचा बोजा चढविला आहे.

Four crores of rupees on the scarcity of 26 farmers in Solapur district, helping to stun | वाळु चोरीला मदत करणाºया सोलापूर जिल्ह्यातील २६ शेतकºयांच्या उताºयावर चार कोटींचा बोजा

वाळु चोरीला मदत करणाºया सोलापूर जिल्ह्यातील २६ शेतकºयांच्या उताºयावर चार कोटींचा बोजा

Next
ठळक मुद्देमहसूल विभागाने ४ कोटी ९ लाख ५० हजार ४९८ रुपयांचा बोजा चढविलातडवळ भागातील सीना-भीमा नदीपात्रातून अवैध वाळू उपसासात-बारा उताºयावर बोजा चढविण्याची कायदेशीर कार्यवाही

अक्कलकोट : तडवळ भागातील सीना-भीमा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाºयांना वाहतुकीसाठी शेतातून रस्ता देऊन वाळू तस्करीला मदत करणाºया कुडल, गुड्डेवाडी, शेगाव, केगाव खु., कोर्सेगाव, अंकलगे या गावातील २६ शेतकºयांच्या सात-बारा उताºयावर महसूल विभागाने ४ कोटी ९ लाख ५० हजार ४९८ रुपयांचा बोजा चढविला आहे. 

तत्कालीन तहसीलदार दीपक वजाळे, हनुमंत कोळेकर यांनी वाळू तस्करी करणाºयांना मदत करणाºया नदीकाठच्या काही शेतकºयांनी आपल्या शेतातून रस्ता देऊन मदत करत असल्याचा अहवाल गाव कामगार तलाठी व मंडळ अधिकाºयांकडून प्राप्त करून घेतले. त्यानुसार संबंधितांना म्हणणे देण्यासाठी नोटिसा काढण्यात आल्या होत्या. त्यानंतर तहसील विभागांकडून संबंधित शेतकºयांच्या सात-बारा उताºयावर बोजा चढविण्याची कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. 

शेतकरी आणि चढविलेला बोजा
कुडल- अर्जुन मरगूर, भीमराया मरगूर, संगीता मरगूर यांना प्रत्येकी ९ लाख ७० हजार ६६६ तर रखमाबाई जमादार यांच्या उताºयावर २ लाख ३२ हजार ५०० रुपये,  गुड्डेवाडी-सिद्धाप्पा विजापुरे यांच्या उताºयावर १० लाख रुपये, श्रीशैल ढब्बे ४५ लाख ५०, सिद्धप्पा विजापुरे यांच्या उताºयावर पुन्हा ७२ लाख २८ हजार, शेगाव येथील उत्तरेश बिराजदार १२ लाख ७९ हजार, जया मिरासदार यांच्या उताºयावर १२ लाख ७९ हजार, केगाव खुर्द. लक्ष्मण मुडवे- ५७ हजार ६०० रुपये, कोर्सेगाव येथील दशरथ बम्मणगे, संगप्पा बम्मणगे, गुरुवाळ बम्मणगे, मलकारी उमदी, लक्ष्मण उमदी, सिद्धण्णा हत्ते, सिद्धप्पा करजगी, रमेश अरवत या  आठ शेतकºयांच्या उताºयावर प्रत्येकी १० लाख ४० प्रमाणे बोजा चढविण्यात आला आहे. तमण्णा चडचण यांच्या उताºयावर ३ लाख ६४ हजार, अंकलगी येथील सिद्धाराम साबणे, काशिनाथ उपासे, राहुल विजापुरे, दयानंद कोणदे, संतोष कोळी, अशोक जमादार या प्रत्येकांच्या उताºयावर २५ लाख ६ हजार ४०० रुपयांचा बोजा चढविण्यात आला आहे. अशा २६ शेतकºयांच्या सात-बारा उताºयावर ४ कोटी ९५ लाख ४९८ रुपयांचा बोजा चढविण्यात आला आहे. 

Web Title: Four crores of rupees on the scarcity of 26 farmers in Solapur district, helping to stun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.