बार्शी तालुक्यात चार दिवसांत ८५ रुग्ण झाले बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:17 AM2021-06-26T04:17:02+5:302021-06-26T04:17:02+5:30

बार्शी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लॉकडाऊननंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर बार्शी शहर व तालुक्यात काही दिवसांपासून ...

In four days, 85 patients were cured in Barshi taluka | बार्शी तालुक्यात चार दिवसांत ८५ रुग्ण झाले बरे

बार्शी तालुक्यात चार दिवसांत ८५ रुग्ण झाले बरे

Next

बार्शी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लॉकडाऊननंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर बार्शी शहर व तालुक्यात काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे ही दिलासादायक बाब आहे. मात्र कोरोनाची वाढही पूर्णपणे थांबलेली नाही हे आकडेवारीवरून दिसून येते.

२१ ते २४ जून या चार दिवसांत ७९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे, तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. शहर व तालुक्यात मिळून सध्या १८३ ॲक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यात आजवर १९,५४४ जणांना कोरोना लागण झालेली आहे. त्यात ४५३ जणांचा मृत्यू झाला तर १८,९०८ उपचारानंतर बरे झाले आहेत.

----

दिलासादायक बाब

सोमवार ते गुरुवार या चार दिवसांत ८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत ही दिलासा देणारी गोष्ट आहे. एकूण पॉझिटिव्ह आढळून आलेल्या ७९ रुग्णांमध्ये बार्शी शहरात २४ तर ग्रामीण भागातील ५५ रुग्ण आहेत. अशी माहिती तालुका प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ढगे यांनी दिली. चार दिवसांत विक्रमी ८,५८१ जणांच्या रॅपिड व आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरात २,५११ तर ग्रामीण भागात ६,०७० जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

---

Web Title: In four days, 85 patients were cured in Barshi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.