उद्यापासून सोलापूर शहरात चार दिवसाआड पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:06 PM2018-12-25T12:06:44+5:302018-12-25T12:08:02+5:30
सोलापूर : बाळे येथील वीज उपकेंद्रातून होणारा वीज पुरवठा बुधवारी दिवसभर खंडित राहणार असल्याने शहरात २६ ते ३१ डिसेंबर ...
सोलापूर : बाळे येथील वीज उपकेंद्रातून होणारा वीज पुरवठा बुधवारी दिवसभर खंडित राहणार असल्याने शहरात २६ ते ३१ डिसेंबर या कालावधीत चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. १ जानेवारीपासून नियमित तीन दिवसाआड पाणीपुरवठा होईल, अशी माहिती महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांनी दिली.
बाळे येथील वीज उपकेंद्रात बुधवारी दिवसभर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे बुधवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत शहरातील पाकणी आणि भवानी पेठ जलशुध्दीकरण केंद्रास वीज पुरवठा होणार नाही. उजनी ते पाकणी आणि भवानी पेठ जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी उपलब्ध होणार नाही.
या कारणास्तव संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा २६ ते ३१ डिसेंबर या कालावधीत एक वेळ तीन दिवसाआड ऐवजी चार दिवसाआड होणार आहे. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे दुलंगे यांनी सांगितले.