विरवडे (बु) येथे चार हरणाची शिकार; एक जण वनविभागाच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:51 PM2019-12-24T12:51:27+5:302019-12-24T12:54:09+5:30

कामती पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल; कातडी वाळवत असताना सापडले दोघे

Four deer hunting at Virwade (Bu); One in the Forest Department | विरवडे (बु) येथे चार हरणाची शिकार; एक जण वनविभागाच्या ताब्यात

विरवडे (बु) येथे चार हरणाची शिकार; एक जण वनविभागाच्या ताब्यात

Next
ठळक मुद्दे- विरवडे बु येथे चार हरणाची शिकार- कामती पोलीस घटनास्थळी दाखल- वनविभागाच्या पथकाने केली कारवाई

सोलापूर/कामती : मोहोळ तालुक्यातील विरवडे बु.येथे आज सकाळी नऊच्या सुमारास चार हरणाची शिकार करून त्याची कातडी वाळवत असताना वनविभाग व मोहोळ पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

 विरवडे बु. येथील निर्जनस्थळी बबन भीमा पवार व एक अज्ञात व्यक्ती हरणाची शिकार करून त्याची कातडी वाळवत असल्याची माहिती पोलिसांना व वनविभागाला मिळाली होती. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस या ठिकाणी गेले असता पोलिसांना पाहताच शिकाºयांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून बबन पवार याला पकडले तर एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला़ या ठिकाणी पोलिसांनी व वनविभागाने केलेल्या कारवाईत हरणाचे मांस व कातडे हस्तगत केले आहे. पुढील कारवाईसाठी या संशयित आरोपीला सोलापुरात आणण्यात आले आहे.

गावात पोलिसांचा फौजफाटा पाहून नागरिकांची भरपूर गर्दी झाली होती. अचानक झालेली गर्दी पाहून नागरिकांतून वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत होते, पण पोलिसांनी जप्त केलेल्या हरणाच्या कातडे व मांसावरून  हरणाची शिकार करणाºयांची चोरी पकडलेचे उघड झाले.


 

Web Title: Four deer hunting at Virwade (Bu); One in the Forest Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.