बार्शी तहसीलसमोर चार तास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:38 AM2020-12-15T04:38:21+5:302020-12-15T04:38:21+5:30

तानाजी ठोंबरे व शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी ॲड. आरगडे, दीपक आंधळकर, ...

Four hours agitation in front of Barshi tehsil | बार्शी तहसीलसमोर चार तास आंदोलन

बार्शी तहसीलसमोर चार तास आंदोलन

Next

तानाजी ठोंबरे व शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी ॲड. आरगडे, दीपक आंधळकर, लक्ष्मण घाडगे, प्रा. काॅ. एस. एस. जाधव, प्रा. डाॅ. अशोक कदम, जुगलकिशोर तिवारी, शलाका पाटील, प्रवीण मस्तुद, शौकत शेख, अनिरुद्ध नखाते, तानाजी जगदाळे, विवेक गजशिव, तानाजी बोकेफोडे, पवन आहिरे, शाफीन शेख, जीमल खान, वसिम पठाण, अविराज चव्हाण, भारत पवार, भारत भोसले, शंकर वाघमारे उपस्थित होते.

तानाजी ठोंबरे म्हणाले, भाजपने संमत केलेले तीन कृषी कायदे शेतकरीविरोधी असतानाही भाजप ते शेतकऱ्यांच्या फायद्याचे कसे आहे हे समजून सांगत आहे. भाजपच्या दानवेचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. भाऊसाहेब आंधळकर म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समिती जीवनावश्यक वस्तू यांचा बाजार मांडून ते भांडवलदारांच्या ताब्यात देण्याचा घाट सरकारने घातला आहे. हा कट आम्ही शेतकरी कामगारांच्या लढ्याने उद्‌ध्वस्त करू.

या मोर्चात अखिल भारतीय किसान सभा, शिवसेना, काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, वंचित बहुजन आघाडी, अंधश्रध्दा निर्मूलन समिती, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आयटक डाॅ. जगदाळेमामा हाॅस्पिटल श्रमिक संघ, आयटक बांधकाम कामगार संघटना, ऑल इंडिया स्टुडंट्‌स फेडरेशन, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रवादी लिगल सेल, आयटक ग्रामपंचायत कर्मचारी संघटना,आदिवासी संघटना, राजमाता इंदूताई आंधळकर अन्नछत्रालय, भीम टायगर संघटना, प्रहार संघटना, छावा संघटना आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.

तहसीलदार प्रदीप शेलार यांना निवेदन देण्यात आले.

फोटो

१४बार्शी आंदोलन

ओळी

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बार्शी येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करताना आंदोलक.

Web Title: Four hours agitation in front of Barshi tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.