इलेक्शनसाठी दिलेल्या बंदोबस्ताचे चार लाख थकवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:23 AM2021-05-20T04:23:47+5:302021-05-20T04:23:47+5:30

करमाळा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी पुरविण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताच्या खर्चाचे ३० लाख ९५ हजार ...

Four lakh spent on election security | इलेक्शनसाठी दिलेल्या बंदोबस्ताचे चार लाख थकवले

इलेक्शनसाठी दिलेल्या बंदोबस्ताचे चार लाख थकवले

Next

करमाळा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी पुरविण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताच्या खर्चाचे ३० लाख ९५ हजार रुपये अद्याप भरले नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक शाखा व पोलीस अधीक्षकांनी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीला नोटीस बजावली आहे.

सन २०१८ ला झालेल्या करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत करमाळा पोलीस स्टेशनच्या वतीने बंदोबस्त पुरविण्यात आला होता. या बंदोबस्तासाठीची ३० लाख ९५ हजार ५१९ रुपये इतक्या खर्चाची मागणी वारंवार करूनही बाजार समितीने भरले नाहीत. ही रक्कम तात्काळ भरण्यासाठी पाेलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीला नोटीस दिली आहे.

---

बाजार समितीच्या निवडणुकीच्या खर्चासंदर्भात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नोटिसा आल्या आहेत. याबाबत निवडणूक प्राधिकरणाकडून मार्गदर्शन घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.

-सुनील शिंदे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, करमाळा.

Web Title: Four lakh spent on election security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.