शाळेच्या पहिल्या दिवशीच मिळणार चार लाख विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 06:32 PM2023-05-22T18:32:20+5:302023-05-22T18:32:33+5:30
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनातर्फे मोफत पाठ्यपुस्तके दिले जातात.
शीतलकुमार कांबळे, सोलापूर: जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खाजगी संस्थांच्या शाळेतील मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशीच मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. यासाठी शिक्षण विभागाने तयारी केली असून चार लाख 34 हजार विद्यार्थ्यांना ती पाठ्यपुस्तके दिली जाणार आहे.
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनातर्फे मोफत पाठ्यपुस्तके दिले जातात. यंदाच्या वर्षी देखील पाठ्यपुस्तके देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे पहिली ताटीची पुस्तके आली असून करमाळा व मोहोळ या तालुक्यापासून पाठ्यपुस्तकांच्या वाटपात सुरुवात झाली आहे . सध्या शाळांमध्ये पाठ्यपुस्तक देण्याचे देण्यात येत असून मुलांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक देण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी संजय जाहीर यांनी सांगितले.