सांगोल्यात चार लाखांची चोरी

By admin | Published: June 15, 2014 12:46 AM2014-06-15T00:46:02+5:302014-06-15T00:46:02+5:30

मुद्देमाल माण नदीत; चोरटे फरार

Four lakhs of theft in Sangola | सांगोल्यात चार लाखांची चोरी

सांगोल्यात चार लाखांची चोरी

Next


सांगोला : मामाच्या घरी पाहुणे म्हणून आलेल्या भाचाच्या उशाखाली ठेवलेली ४ लाख ५ हजार रुपयांची रोख रक्कम, रिव्हॉल्व्हर, एटीएम कार्ड अशा मुद्देमालांची सुटकेस चोरून नेली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास बलवडी (ता. सांगोला) येथे घडली.
इंदौर-मध्यप्रदेश (रा. श्रीराम तलावली धार रोड) येथील उदयसिंह प्रतापराव खुटाळ यांचा कन्स्ट्रक्शन कंपनीचा व्यवसाय आहे. त्यांचे बलवडी (ता. सांगोला) येथील युवराज उर्फ रावसाहेब विजयसिंह लिगाडे नात्याने मामा आहेत. शुक्रवार, १३ जून रोजी उदयसिंह खुटाळ मामाकडे आले होते.
दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद घराची कडी काढून ठेकेदार उदयसिंह खुटाळ यांच्या उशाखाली ठेवलेले ४ लाख ५ हजार रूपये, सहा जिवंत काडतूस असलेले रिव्हॉल्व्हर, पॅनकार्ड, आठ विविध बँकांचे एटीएम कार्ड, कोरे चेकबुक अशी एकत्रित कागदपत्रे असलेली सुटकेस घेऊन चोरट्याने पोबारा केला.
उदयसिंह खुटाळ शनिवारी सकाळी झोपेतून उठल्यानंतर त्यांना सुटकेस चोरीला गेल्याचे समजले. या घटनेची माहिती पो.नि. दयानंद गावडे यांना समजताच त्यांनी स.पो.नि. महादेव कुंभार व पोलीस कर्मचाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पाठवून दिले.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून जागेचा पंचनामा केला. पोलिसांनी तत्काळ सोलापूर येथून श्वान पथक व ठसे तज्ज्ञास पाचारण केले. दुपारपर्यंत पोलिसांच्या मदतीने श्वान पथक माग घेत असताना चोरीस गेलेली पैशाची सुटकेस माण नदीच्या पात्रात सापडली. पोलिसांनी पंचांसमक्ष सुटकेसमधील रकमेची मोजदाद केली असता सुटकेसमधील ४ लाख ५ हजार रूपयांपैकी ४० हजार रूपये कमी असल्याचे आढळून आले आहे. तर रिव्हॉल्व्हर व इतर कागदपत्रे सुरक्षित असल्याचे सांगितले. उदयसिंह प्रतापराव खुटाळ यांनी अज्ञात चोरट्याविरूध्द पोलिसात फिर्याद दिली असून, तपास स.पो.नि. महादेव कुंभार करीत आहेत.
--------------------------------------
पोलिसांनी सोडला सुटकेचा निश्वास
४चोरीच्या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी मागविलेल्या श्वान पथकाच्या मदतीने चोरीस गेलेल्या मुद्देमालांची सुटकेस नजीकच्या नदी पात्रात सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

Web Title: Four lakhs of theft in Sangola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.