अमेरिकास्थित बार्शीच्या लेकीकडून चार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:18 AM2021-06-04T04:18:06+5:302021-06-04T04:18:06+5:30
बार्शीच्या स्व. श्याम जाजू यांची कन्या व लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष राजकुमार पल्लोड यांची सून अमिता किशोर पल्लोड ...
बार्शीच्या स्व. श्याम जाजू यांची कन्या व लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष राजकुमार पल्लोड यांची सून अमिता किशोर पल्लोड या अमेरिकेत एमसेलविनिया येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी आपले माहेर बार्शीतील जीवलग मैत्रिण स्मिता किरण देशमुख यांच्याशी संपर्क केला. बार्शीतील कोरोना संकटाला सामोरे जाण्यासाठी अल्पसा दिलासा, आधार देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी चार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर डिव्हायसेस देऊ केले.
स्मिताने लगोलग आपले वडील मातृभूमी प्रतिष्ठानचे सचिव प्रतापराव जगदाळे यांना आपल्या मैत्रिणीचा मनोदय सांगितला. प्रतापरावांनीही लागलीच अध्यक्ष संतोष ठोंबरे, अजित कुंकूलोळ, अशोक हेड्डा, डॉ. लक्ष्मीकांत काबरा, मुरलीधर चव्हाण, गौतम कांकरिया, राजा माने, प्रा. मधुकर डोईफोडे, प्रा. किरण गाडवे, किरण देशमुख व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
युवा आघाडीचे रमण हेड्डा यांनी समन्वय साधला आणि अमिता या बार्शीच्या लेकीने पाठविलेली ही जिव्हाळ्याची मदत मातृभूमीच्या स्वाधीन केली.
प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विनय संघवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अमिता पल्लोड यांनी पाठवलेली ही मदत त्यांची मैत्रिण स्मिता देशमुख यांच्या हस्ते विनय संघवी यांना हस्तांतरित केली. यावेळी स्मिताचे पती बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनचे सचिव प्रा. किरण देशमुख हे उपस्थित होते.
---
कॉन्सन्ट्रेटर बँकही सुरू
चौकट
ऑक्सिजन सिलिंडर बँकेप्रमाणे आता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँकही सुरू करण्यात आली आहे. पोस्ट कोविड असलेल्या गरजू रुग्णांना या मशीन वापरासाठी मोफत देण्यात येणार आहेत. पुढील आठवड्यात आणखी मशिन्स येणार असल्याचे अध्यक्ष संतोष ठोंबरे यांनी सांगितले.