बस-ट्रकच्या धडकेने चालकासह चार प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:27 AM2021-08-17T04:27:20+5:302021-08-17T04:27:20+5:30

बार्शी : परांडा आगाराची एस.टी. बस परांड्याकडे निघाली असताना भरधाव वेगात समोरून येणाऱ्या ट्रकची धडक बसली. या अपघातात बसचालकासह ...

Four passengers, including the driver, were injured in the bus-truck collision | बस-ट्रकच्या धडकेने चालकासह चार प्रवासी जखमी

बस-ट्रकच्या धडकेने चालकासह चार प्रवासी जखमी

Next

बार्शी : परांडा आगाराची एस.टी. बस परांड्याकडे निघाली असताना भरधाव वेगात समोरून येणाऱ्या ट्रकची धडक बसली. या अपघातात बसचालकासह चौघेजण जखमी झाले. शुक्रवारी रात्री बार्शी-परांडा रस्त्यावर लक्ष्याची वाडी गावाजवळ हा अपघात झाला.

याबाबत बसचालक सतीश गुंडा पसारे (रा. बेंबळे, जि. उस्मानाबाद) यांनी तालुका पोलिसांत ट्रकचालक रोहिदास ज्ञानदेव चंदनशिवे यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे. जखमी बसचालक व इतर जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.

अपघातातील बस ही उस्मानाबादमार्गे बार्शी आगारात आली आणि प्रवासी घेऊन परांड्याकडे निघाली होती. लक्ष्याच्या वाडीजवळ बस (एम. एच. १३/ बी. ०४७१) येताच समोरील ट्रक चालक वेडावाकडा चालवीत राहिला. चालकाने बस डाव्या बाजूस थांबविली असता ट्रकने धडक दिली. अपघातात बसचे नुकसान झाले आहे.

-----

Web Title: Four passengers, including the driver, were injured in the bus-truck collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.