अक्कलकोटच्या राजवाड्यातून सागवान पळवणाऱ्या कामगारासह चौघांना गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:21 AM2021-04-25T04:21:55+5:302021-04-25T04:21:55+5:30

अक्कलकोट : नवीन राजवाड्यातून लाखो रुपयांच्या शुद्ध सागवानाची चोरी केल्याप्रकरणी येथील एका कामगारासह त्याच्या चौघा साथीदारांना अक्कलकोट पोलिसांनी ...

Four people, including a teak smuggler, were abducted from Akkalkot's palace | अक्कलकोटच्या राजवाड्यातून सागवान पळवणाऱ्या कामगारासह चौघांना गजाआड

अक्कलकोटच्या राजवाड्यातून सागवान पळवणाऱ्या कामगारासह चौघांना गजाआड

Next

अक्कलकोट : नवीन राजवाड्यातून लाखो रुपयांच्या शुद्ध सागवानाची चोरी केल्याप्रकरणी येथील एका कामगारासह त्याच्या चौघा साथीदारांना अक्कलकोट पोलिसांनी अटक केली. या चौघांना अक्कलकोट येथील न्यायालयात उभे केले असता न्यायदंडाधिकाऱ्यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान इटगे या गावात दडवून ठेवलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

२७ मार्च रोजी हा चोरीचा प्रकार घडला होता. याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार अक्कलकोट येथील नवीन राजवाड्यातील गोडाऊनमध्ये शुद्ध सागवानीचे अनेक लाफ्टर असल्याची माहिती या राजवाड्यात काम करणार आरोपी स्वामिनाथ सुरेश मडीखांबे (रा. भीमनगर, अक्कलकोट) याला मिळाली होती. २७ मार्च रोजी रात्री १० वाजता मडीखांबे याने अशोक गौरीशंकर जवळगीकर(रा.कुंभार गल्ली, अक्कलकोट), परमेश्वर ऊर्फ प्रवीण यलप्पा मिनगले (रा. बेडर गल्ली, अक्कलकोट), आनंद राजप्पा नासेकर (रा.हसापूर, ता.अक्कलकोट) या साथीदारांना सोबत घेऊन आला आणि १ लाख ६५ हजार रुपयांचे सागवान पळविले. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास येथील कर्मचारी शशिकांत लिंबीतोटे यांना सागवान चोरीला गेल्याचे समजले. त्यांनी उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

या आरोपींना पकडण्याच्या कामात अंमलदार यमाजी चव्हाण, फुलारी, महादेव चिंचोळकर, आसिफ शेख, प्रशांत कोळी, अन्सारी, गजानन गायकवाड यांनी सहभाग धेतला. या खटल्यात सरकारी वकील म्हणून इस्माईल बेसकर यांनी काम पाहिले.

----

पोलीस कोठडीत काढून दिला मुद्देमाल

या प्रकरणानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल यमाजी चव्हाण यांनी संशयित आरोपी कर्मचारी मडीखांबे याला ताब्यात चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या अन्य तीन साथीदारांना अटक करून येथील न्यायाधीश शरद गवळी यांच्या न्यायालयात उभे केले असता सुरुवातीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीतील तपासात आरोपीकडून सुरुवातीला पाच आणि नंतर पाच असे दहा शुद्ध सागवानी लाफ्टर जप्त केले. अक्कलकोट शहराजवळील इटगे या गावातून हे सागवान पोलिसांनी जप्त केले.

--

२४ अक्कलकोट

अक्कलकोट येथील नवीन राजवाड्यातून शुद्ध सागवानीचे चोरी करणाऱ्या चौघांना अटक केल्यानंतर पोलीस निरीक्षक कल्लप्पा पुजारी, अंमलदार यमाजी चव्हाण, फुलारी, महादेव चिंचोळकर, अंगद गीते.

Web Title: Four people, including a teak smuggler, were abducted from Akkalkot's palace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.