यूपीएससीत परीक्षेत सोलापूरचा चौकार, कंपनीतील नोकरी सोडून मिळवली 'जीत'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:22 AM2021-09-25T04:22:58+5:302021-09-25T10:33:46+5:30
सोलापूर - बार्शी तालुक्यातील कळंबवाडी येथील निखिल उर्फ जयजीतसिंह जरीचंद उमाप हा देशात ७५९ वा आला आहे. त्याने पुणे ...
सोलापूर - बार्शी तालुक्यातील कळंबवाडी येथील निखिल उर्फ जयजीतसिंह जरीचंद उमाप हा देशात ७५९ वा आला आहे. त्याने पुणे व मुंबई येथे खासगी कंपनीत चार वर्षे नोकरी केली. त्यानंतर त्याने नोकरीचा राजीनामा देऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. या कालावधीत २०१९ ला केंद्रीय परीक्षेत गुप्तचर विभागात नोकरी लागली. ही नोकरी करत अभ्यास सुरू ठेवला होता. तीन वेळा लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली मात्र यशाने हुलकावणी दिली. मात्र काहीही करून आपण यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन यश मिळवायचे ही जिद्द कायम होती. त्याच्या जिद्दीला यश मिळाले. तर अजिंक्य विद्यागर हा ६१७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. विशेष म्हणजे विद्यागर हा दुसऱ्यांदा हा परीक्षा पास झाला आहे. अजिंक्य याने शिक्षण सुरू असताना दोन वेळा यूपीएससी परीक्षा दिली, पण यश आले नाही. आता तिसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र यश प्राप्त झाल्याचे अजिंक्य विद्यागर यांनी दीड वर्षापूर्वी म्हटले होते. आज अजिंक्य यांनी दुसऱ्यांदा यश मिळवत बार्शीत इतिहास घडवला आहे.
तसेच माळशिरस तालुक्यातील वाघोली येथील एका शेतकऱ्याचा मुलगा सागर भारत मिसाळ याने ३५४ क्रमांकाने पास होऊन यश संपादन केले आहे. यापूर्वी सागर मिसाळ यांनी २०२० मध्येही २०४ क्रमांकाने यश मिळवून उत्तराखंड या राज्यात आयएएस पदावर त्यांची निवड झाली होती. जिल्हाधिकारी व्हायचे स्वप्न मनी बाळगून दुसऱ्यांदा प्रयत्न केले. त्यात त्यांनी यश प्राप्त केले आहे. हा दुसरा प्रयत्न केला होता त्यातही यश प्राप्त केले. तसेच सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील शिंदेवाडी (ता. माळशिरस) गावातील शेतकरी पांडुरंग जाधव यांचा मुलगा शुभम जाधव याने ४४५ क्रमांकाने यश मिळविले आहे. त्याने आतापर्यंत पाचवेळा ही परीक्षा दिली. पाचव्यावेळी त्याला यश मिळाले.
..........
चार फोटो आहेत.