शहरात चार ठिकाणी बसवर दगडफेक

By admin | Published: June 2, 2014 12:50 AM2014-06-02T00:50:29+5:302014-06-02T00:50:29+5:30

सोलापूर : सोशल साईटवर राष्ट्रपुरुषांची अवमानकारक छायाचित्रे टाकल्यानंतर शहरात पडसाद उमटले़ जुना पुणे नाका, तुळजापूर रोड, डी मार्ट आणि हैदराबाद रोड अशा चार ठिकाणी एस़टी़ बसवर दगडफे कीचा प्रकार घडला़

Four stone-pelting stones in the city | शहरात चार ठिकाणी बसवर दगडफेक

शहरात चार ठिकाणी बसवर दगडफेक

Next

 

सोलापूर : सोशल साईटवर राष्ट्रपुरुषांची अवमानकारक छायाचित्रे टाकल्यानंतर शहरात पडसाद उमटले़ जुना पुणे नाका, तुळजापूर रोड, डी मार्ट आणि हैदराबाद रोड अशा चार ठिकाणी एस़टी़ बसवर दगडफे कीचा प्रकार रविवारी सायंकाळी घडला़ जुना पुणे नाका येथे आल्यानंतर एम़एच़२० व्ही़सी़१८०७ तर याच परिसरात डी मार्टजवळ एम़एच़१३ व्ही़ ४०१ क्रमांंकाच्या बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करुन नुकसान केले़ हैदराबाद रोडवर हैदराबाद-बारामती (एम़एच़०७, ९६०३) एस़टी़बसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली़ रविवारी सायंकाळी घडलेल्या घटनांची फौजदार चावडी पोलीस ठाणे, सदर बझार पोलीस ठाणे आणि जोडभावी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे़ ७५ हजारांची घरफोडी सोलापूर :विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत शिवगंगानगर भाग १ मध्ये विक्रांत प्रदीपराव देसाई यांचे घर फोडून चोरट्यांनी लॅपटॉपसह ७५ हजारांचा ऐवज पळविला़ ३१ मे रोजी सकाळी ९ वाजता ही घरफोडी उघडकीस आली़ देसाई हे घर बंद करुन बाहेरगावी गेले होते़ दरम्यान चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून बेडरुममधील ३६ हजारांचा लॅपटॉप, ३६ हजार रुपयांच्या चांदीच्या देवाच्या मूर्ती, घड्याळ असा ऐवज पळविला़ डॉल्बी बंद केल्याने दगडफेक सोलापूर : रात्री विहीत वेळेत शिवाजी चौकामध्ये डॉल्बी बंद केल्याने चिडून जाऊन अर्जुन सोनवणे(वय २२, रा़ अवंतीनगर), नागराज भीमाशंकर गुडदीर (वय १९, रा़ पश्चिम मंगळवारपेठ), वैभव सुरेश दीक्षित (वय २६, रा़शुक्रवारपेठ) या तिघांनी शनिवारी रात्री १०़१५ वाजता दुचाकी आणि चारचाकीवर दगडफेक केली़ याप्रकरणी सुभाष अध्यापक यांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली आहे़ जामदार टॉवर समोर ही घटना घडली़

 

Web Title: Four stone-pelting stones in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.