यांचे चार.. त्यांचे चार अन् आरक्षणात सरपंचपदाचा दावेदार ठरला तिसऱ्या पॅनलचा उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:43 AM2021-02-05T06:43:22+5:302021-02-05T06:43:22+5:30
चिंचोलीकाटी औद्योगिक वसाहतीलगतच्या बीबीदारफळ, कोंडी, अकोलेकाटी व पाकणी या ग्रामपंचायतीच्याही निवडणुका होतात, मात्र चिंचोलीकाटीची निवडणूक वेगळ्या अर्थाने गाजते. निवडणूक ...
चिंचोलीकाटी औद्योगिक वसाहतीलगतच्या बीबीदारफळ, कोंडी, अकोलेकाटी व पाकणी या ग्रामपंचायतीच्याही निवडणुका होतात, मात्र चिंचोलीकाटीची निवडणूक वेगळ्या अर्थाने गाजते. निवडणूक आली की, पॅनलप्रमुखांनी मोठी आर्थिक तरतूद करून ठेवल्याची चर्चा सुरू होते. ती निवडणुकीच्या निकालानंतरही सुरू असते. अशातही निकाल काय लागतो, हा भाग वेगळाच?
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत चिंचोलीकाटी ग्रामपंचायतीचे ९ सदस्य निवडण्यासाठी तीन स्वतंत्र पॅनल रिंगणात उतरले होते. यामध्ये दादासाहेब नागणे यांच्या सुजल ग्रामविकास पॅनलचे चार, चंद्रकांत नागणे- भोसले व इतरांच्या धर्मराज परिवर्तन विकास आघाडीचे चार व राजेश पाटील यांच्या पॅनलमधील ९ पैकी केवळ एक सदस्य म्हणजे त्यांच्या पत्नीच विजयी झाल्या. सरपंचपदाचे आरक्षण योगायोगाने सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. दादासाहेब नागणे गटाच्या चार, चंद्रकांत नागणे गटाच्या चार व सरपंचपदाचे आरक्षण असलेले राजेश पाटील यांच्या गटाच्या एका सदस्यामधून सरपंच निवड होणार आहे.
दोन्ही गटाचे दावे.. सरपंच आमचाच होणार
औद्योगिक वसाहतीमधील विविध कंपन्यांकडून कराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीला पैसे मिळतात. त्यामुळेच कोण, कोणासोबत जाईल व सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे सांगता येत नाही. सध्यातरी चार- चार सदस्य निवडून आणणारे पॅनलप्रमुख आमचाच सरपंच होईल, असा दावा करीत आहेत.