ट्रकच्या धडकेत चारचाकी वाहन पलटी होऊन तीन प्रवासी जखमी; अक्कलकोट तालुक्यातील घटना

By विलास जळकोटकर | Published: July 16, 2024 07:00 PM2024-07-16T19:00:29+5:302024-07-16T19:00:43+5:30

रतन धनसिंग राठोड (वय ४८), सखुबाई हिरामणी राठोड (वय ४५), गीता अजय जाधव (वय २८, सर्व रा. सातन दुधनी, ता. अक्कलकोट) अशी जखमींची नावे आहेत.

Four-wheeler overturned in collision with truck, three passengers injured; Incidents in Akkalkot Taluk | ट्रकच्या धडकेत चारचाकी वाहन पलटी होऊन तीन प्रवासी जखमी; अक्कलकोट तालुक्यातील घटना

ट्रकच्या धडकेत चारचाकी वाहन पलटी होऊन तीन प्रवासी जखमी; अक्कलकोट तालुक्यातील घटना

सोलापूर : सातन दुधनी येथून अक्कलकोटकडे चारचाकी यूको वाहनातून प्रवास करणाऱ्या तिघांना समोरुन येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने सदर वाहन पलटी होऊन तिघे प्रवासी जखमी झाले. बोरीे उमरगे गावाजवळ (ता. अक्कलकोट) मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. तिघांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

रतन धनसिंग राठोड (वय ४८), सखुबाई हिरामणी राठोड (वय ४५), गीता अजय जाधव (वय २८, सर्व रा. सातन दुधनी, ता. अक्कलकोट) अशी जखमींची नावे आहेत.

यातील जखमी प्रवासी सातन दुधनी येथून चारचाकी यूको वाहनातून अक्कलकोटकडे येत होते. बोरी उमरगे गावाजवळ त्यांचे वाहन आले असता समोरुन येणाऱ्या ट्रकने वाहन निष्काळजीपणे चालवल्याने वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाले. जखमींना हातास, डोक्यास, पायास जखम झाली.

त्यांना उपचारासाठी सर्वप्रथम अक्कलकोट येथील सरकारी दवाखान्यात नेऊन प्रथमोपचार करण्यात आले. तेथून मामा रवींद्र पवार यांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. सर्व जखमी शुद्धीवर असून, एकावर उपचार करुन सोडण्यात आले. अन्य दोघे उपचार घेत आहेत. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेनी नोंद आहे.
 

Web Title: Four-wheeler overturned in collision with truck, three passengers injured; Incidents in Akkalkot Taluk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.