स्फोटासाठी वापरण्यात येणारे चौदा डिटोनेटर जप्त, पाच जणांना अटक, सोलापूरातील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 03:16 PM2018-10-08T15:16:01+5:302018-10-08T15:19:05+5:30

या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असुन ही कारवाई सोमवारी पहाटे २.४५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. 

Fourteen detonators used for the explosion were seized, five were arrested, incident occurred in Solapur | स्फोटासाठी वापरण्यात येणारे चौदा डिटोनेटर जप्त, पाच जणांना अटक, सोलापूरातील घटना 

स्फोटासाठी वापरण्यात येणारे चौदा डिटोनेटर जप्त, पाच जणांना अटक, सोलापूरातील घटना 

Next
ठळक मुद्दे- फौजदार चावडी पोलीसाची कामगिरी- पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल- १४ सिल्व्हर रंगाच्या डेटोनेटर कांड्या जप्त

सोलापूर : भैय्या चौकाजवळील रेल्वे पुलाजळ स्फोटासाठी वापरण्यात येणारे १४ डिटोनेटर जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असुन ही कारवाई सोमवारी पहाटे २.४५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. 

गजरूप मनमोहन अगरिया (वय-२९ रा. अलहरा, पोस्टे उंवा ता. बेव्हरी जि.शेहडोल-मध्यप्रदेश), मोहित गन्नासिंग मरावी (वय-२0 रा. पांडपुर झनकी ता. बगाज जि.दिंडोरी-मध्यप्रदेश), बहादुरसिंग सुखराम बैगा (वय-१९ रा. पांडपुर झनकी ता. बजाग जि.दिंडोरी-मध्यप्रदेश) व दोन विधीसंघर्ष मुले असे एकूण पाच जण अटक करण्यात आले आहेत. 

सहायक पोलीस निरीक्षक गोविंद पांढरे (वय-५0  नेमणूक फौजदार चावडी पोलीस स्टेशन) हे रात्रीची गस्त घालत होते. भैय्या चौकातील नरसिंग गिरजी मिलच्या लगत असलेल्या रेल्वे पुला जवळ पाच लोक आढळुन आले. त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना जास्त संशय आल्याने त्यांनी मरिआई पोलीस चौकीच्या हद्दीतील बिट मार्शला बोलावुन घेतले. पाच जणांची तपासणी केली असता त्यांच्याकडी पिशवीमध्ये स्फोटासाठी वापरण्यात येणारे १४ सिल्व्हर रंगाच्या डेटोनेटर कांड्या मिळुन आल्या. हे स्फोटके बेकायदा व बिगरपास होते. पाच जणांविरूद्ध स्फोटक पदार्थ अधि. १९0८ चे कायदा कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप करीत आहेत. 


 

Web Title: Fourteen detonators used for the explosion were seized, five were arrested, incident occurred in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.