हातात राजदंड घेतलेल्या शिवछत्रपतींची चौदा फुटी सिंहासनाधिष्ठ मूर्ती साकारतेय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 04:26 PM2020-01-22T16:26:41+5:302020-01-22T16:31:38+5:30

कात्रजमध्ये कामास गती; सोलापुरातील मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत घडणार दर्शन

Fourteen feet of Shiv Chhatrapati taking the scepter in his hand is adorning the throne! | हातात राजदंड घेतलेल्या शिवछत्रपतींची चौदा फुटी सिंहासनाधिष्ठ मूर्ती साकारतेय !

हातात राजदंड घेतलेल्या शिवछत्रपतींची चौदा फुटी सिंहासनाधिष्ठ मूर्ती साकारतेय !

googlenewsNext
ठळक मुद्दे- छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना एकत्र आणून हिंदवी स्वराज स्थापन केलेआता नव्याने शिवछत्रपतींची मूर्ती बनवण्याचा निर्णय महामंडळाच्या विश्वस्तांनी घेतला आहे पुण्यातील कात्रज भागात राहणारे शिल्पकार उमेश व्हरकट यांंना मूर्तीचे काम देण्यात आले आहे

रेवणसिद्ध जवळेकर

सोलापूर : हातात राजदंड घेऊन सिंहासनावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची चौदा फुटी मूर्ती पुण्यातील कात्रजमध्ये साकारण्याचे काम सुरू असून, मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळाच्या मिरवणुकीत छत्रपतींच्या या मूर्तीचे दर्शन तमाम सोलापूरकरांना घडणार असल्याचे महामंडळाचे नूतन अध्यक्ष केकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव साजरा होत असून, त्याआधी शिंदे चौकातील डाळिंबी आड मैदानावर महामंडळाच्या वतीने शिवछत्रपतींची मूर्ती प्रतिष्ठापना होत असते. आता नव्याने शिवछत्रपतींची मूर्ती बनवण्याचा निर्णय महामंडळाच्या विश्वस्तांनी घेतला आहे. पुण्यातील कात्रज भागात राहणारे शिल्पकार उमेश व्हरकट यांंना मूर्तीचे काम देण्यात आले आहे. राजे शिवछत्रपती हातात राजदंड घेऊन सिंहासनावर बसले आहेत. राजे शिवछत्रपतींची भावमुद्रा अन् हातातील राजदंड शिवप्रेमींच्या नजरेत भरणारा आहे.

शिल्पकार उमेश व्हरकट यांच्या उत्तम कलेतून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती साकारत असून, प्रदीप कुंभार, संतोष लोणकर, प्रशांत बंजाळ, योगेश कार्लेकर, राहुल कुंभार हे सध्या मूर्ती साकारण्यात मग्न आहेत. मूर्तीतील बारकावे टिपण्यासाठी अन् मूर्तीला बघताक्षणीच साक्षात महाराजांचेच दर्शन घडावे, यासाठी सोलापूरचे शिवप्रेमी प्रवीण कदम यांनी पुणे फेºया सुरू केल्या आहेत. 

उमेश व्हरकट हे मूळचे सोलापूरचे. मुंबाईच्य जे. जे. स्कूल आॅफ आर्ट येथून त्यांनी शिल्पकलेची पदवी संपादन केली. मुरारजी पेठेतील राघवेंद्र नगरात राहणारे उमेश व्हरकट हे पुण्यातील कात्रज भागात स्थायिक झाले. त्यांनी आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रसंगावरील अनेक मूर्ती महाराष्ट्रासह परप्रांतातही पोहोचल्या आहेत. शिवजन्मोत्सव महामंडळाने यंदा त्यांना हातात राजदंड घेतलेल्या शिवछत्रपतींची सिंहासनाधिष्ठ मूर्तीचे काम दिले आहे. या मूर्ती कामासाठी चार लाख रुपये खर्च येणार असून, मूर्तिकलेत मल्टिकलरचा वापर करण्यात आला आहे. 

अध्यक्षपदाचा मान नामदेव शिंपी समाजाला-काळे
- छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना एकत्र आणून हिंदवी स्वराज स्थापन केले, हाच कानमंत्र घेऊन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळाचे यंदाचे अध्यक्षपद नामदेव शिंपी समाजाला देण्यात आल्याचे महामंडळाचे विश्वस्त तथा माजी उपमहापौर पद्माकर काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

- समाजातील सामाजिक कार्यकर्ते अन् शिवछत्रपतींचे निस्सीम भक्त असलेले अमोल अशोक केकडे यांची यंदाच्या महामंडळाच्या            अध्यक्षपदी निवड झाली. निवडीवेळी माजी उपमहापौर पद्माकर काळे, शिवसेनेचे नूतन जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे, राजन जाधव, नगरसेवक विनोद भोसले, सुनील रसाळे, दिलीप कोल्हे आदी उपस्थित होते. 

शालेय जीवनात छत्रपती शिवाजी महाराजांवरील अनेक पुस्तके वाचली. त्यांचा पराक्रम, शौर्य अन् सर्वच जाती-धर्मांना पुढे घेऊन जाणारे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे माझ्यासाठी दैवत बनले. माझी ही निष्ठा पाहून महामंडळाच्या विश्वस्तांनी माझ्यासारख्या मावळ्याला अध्यक्षपद दिले, ही गौरवास्पद बाब आहे.
-अमोल केकडे, नूतन अध्यक्ष, मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळ

मूळचा मी सोलापूरचा. मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळाने मला हातात राजदंड घेतलेल्या शिवछत्रपतींची सिंहासनाधिष्ठ मूर्ती साकारण्याचे काम दिले. सोलापूरकर जेणेकरून शहरातील तमाम शिवप्रेमींची सेवा करण्याची संधी मिळाली, याचा मनस्वी आनंद आहे. 
-उमेश व्हरकट, शिल्पकार, पुणे

Web Title: Fourteen feet of Shiv Chhatrapati taking the scepter in his hand is adorning the throne!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.