सोलापुरातील नगरसेवकाच्या मुलासह चौदा जणांना 'कोरोना'ची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 07:28 PM2020-05-03T19:28:46+5:302020-05-03T20:23:40+5:30

सोलापुरातील एकूण 'कोरोना' बाधित रुग्णांची संख्या झाली १२८; शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू

Fourteen people, including the son of a corporator from Solapur, contracted corona | सोलापुरातील नगरसेवकाच्या मुलासह चौदा जणांना 'कोरोना'ची लागण

सोलापुरातील नगरसेवकाच्या मुलासह चौदा जणांना 'कोरोना'ची लागण

Next
ठळक मुद्देसोलापुरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली 128कोरोना बरोबर सारी या आजाराचेही आढळले रुग्णआरोग्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना मंत्र्यांनी केल्या विविध सूचना

सोलापूर : यापूर्वी पॉझीटीव्ह आढळलेल्या नगरसेवकाच्या मुलासह त्यांच्या घरातील तिघांना  'कोरोना'ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी नव्याने चौदा कोरोना बाधित रुग्ण आढळले असून, पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या १२८ इतकी झाली आहे.


शहर व जिल्ह्यातून आत्तापर्यंत २0८0 रुग्ण उपचारास दाखल करण्यात आले, त्यातील १८८३ जणांचे अहवाल आले असून १७५९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आहेत. अद्याप १९७ जणांचे अहवाल यायचे आहेत अशी माहिती प्रशासनाने रविवारी दिली.  दिवसभरात चौदा जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. त्यामध्ये चार महिला व सहा पुरूष आहेत. अशाप्रकारे आता पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या १२८ झाली आहे. पॉझीटीव्ह आलेल्यांमध्ये फॉरेस्ट चांदणी चौकात राहणाºया नगरसेवकाचा मुलगा व इतर दोन कुटंबातील सदस्यांचा समावेश आहे. हे नगरसेवकाला कुमठा नाका येथील रुग्णाच्या संपर्कात आल्याने यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा अहवाल पॉझीटीव्ह आल्यावर कुटुंबातील मंडळींची २ मे रोजी तपासणी करण्यात आली. त्यात तिघांचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.

त्याचबरोबर शास्त्रीनगरातील एका ५0 वर्षीय महिलेला कोरणाची लागण झाली आहे. नई जिंदगीतील साईनाथनगरात राहणाºया ५३ वर्षीय महिलेला सारीची लागण झाली आहे. तसेच बापूजीनगरातील ८0 वर्षाचे आजोबा व २0 वर्षाचा तरुण कोरोना पॉझीटीव्ह आढळले आहेत. भारतरत्न इंदिरानगरातील मुलगी व तिच्या पित्यालाही कोरोणाची बाधा झाल्याचे रविवारच्या अहवालात दिसून आले आहे. पॉझीटीव्ह आलेल्या १२८ रुग्णांपैकी ६ जण मरण पावलेले आहेत, तर १९ जण बरे होऊन घरी परतले आहेत.


दोन रुग्ण पुन्हा पॉझीटीव्ह

यापूर्वी पॉझीटीव्ह म्हणून रुग्णालयात उपचारास दाखल झालेल्या दोघांचा १४ दिवसाचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यांना घरी सोडण्यासाठी एका ३0 वर्षीय महिला व ३0 वर्षाच्या तरुणाची दुबार चाचणी घेण्यात आली. यामध्येही त्यांचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.


पोलिसांनी घेतली खबरदारी

ग्रामीण पोलीस मुख्यालयातील दोन पोलिसांना कोरोणाची लागण झाल्याचे दिसून येताच बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचाºयांनी आता चांगलीच खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे. नाकाबंदीला असलेले कर्मचारी दुरूनच वाहनांची तपासणी व त्यात असलेल्या व्यक्तींपासून दूर राहून नोंदी घेण्याचे काम सुरू केल्याचे दिसून आले. 

Web Title: Fourteen people, including the son of a corporator from Solapur, contracted corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.