बाजार समितीसाठी सर्वच शेतकºयांना मताधिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 02:22 PM2018-04-03T14:22:29+5:302018-04-03T14:22:29+5:30
सोलापूर, बार्शी बाजार समिती निवडणूकीसाठी मतदार यादी १५ मेपर्यंत तर निवडणूक १५ आॅगस्टपर्यंत घेण्याचा न्यायालयाचा आदेश
सोलापूर : सामाईक खात्यावर प्रत्येकी १० गुंठ्यांपेक्षा अधिक शेतजमीन धारण करणाºया शेतकºयांना बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिले. १५ मे पर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याचे आणि त्यानंतर तीन महिन्याच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही न्यायालयाने सहकार प्राधिकरणाला दिले आहेत.
बाजार समितीच्या निवडणुकीत सामाईक खात्यावर एकाच शेतकºयाला मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय पणन खात्याने घेतला होता. यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. यादरम्यान भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचे डोणगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील कार्यकर्ते संजय भोसले यांच्यासह ११९ शेतकºयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
न्यायालयाने १० गुंठ्यांपेक्षा अधिक शेतजमीन धारण करणाºया खातेदारांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय दिला.
भोसले यांच्या वतीने अॅड. अनिल साखरे, अॅड़ बाळकृष्ण जोशी, अॅड़ रोहन मिरपुरी तर सहकार प्राधिकरणाकडून अॅड़ दिलीप बनकर-पाटील यांनी काम पाहिले. नव्या आदेशामुळे मतदानापासून वंचित राहिलेल्या ४५ हजार शेतकºयांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
प्राधिकरणाने दिला संभाव्य कार्यक्रम
उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार एप्रिलअखेर सोलापूर आणि बार्शी बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया होणे अपेक्षित होते. परंतु, मतदार यादीतील घोळामुळे प्रारुप मतदार याद्या तयार व्हायला वेळ लागला. सहकार प्राधिकरणाने यापूर्वी दिलेल्या शपथपत्रात मे महिन्यात निवडणूक घेण्याच्या दृष्टीने तयारी असल्याचे सांगितले होते. आता नव्या आदेशानुसार प्रारुप मतदार यादी केल्यानंतर १५ मेपर्यंत अंतिम यादी तयार करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर ५ जूनपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख, २१ जूनपर्यंत अर्ज मागे घेणे, २२ जूनला अंतिम उमेदवार यादी, ४ जुलैला मतदान आणि ६ जुलै रोजी मतमोजणी घेऊ असे कळविले आहे.
नव्याने मतदार यादी, नव्याने हरकती
च्सोलापूर आणि बार्शी बाजार समितीची प्रारुप मतदार यादी तयार आहे. नव्या आदेशानुसार पुरवणी यादीही तयार करण्यात आली आहे. मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे दोन्ही बाजार समितीची प्रारुप मतदार यादी नव्याने करण्यात येईल. त्यावर नव्याने हरकती घेण्यात येतील, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी सांगितले.