युवा सेनेचे जिल्हाप्रमुख काळजे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:23 AM2021-09-19T04:23:56+5:302021-09-19T04:23:56+5:30

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील सिद्धेश्वर मुत्तुर (रा. दक्षिण सदर बझार, सोलापूर) यांनी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ तालुक्यातील ...

Fraud case against Yuva Sena district chief Kalje | युवा सेनेचे जिल्हाप्रमुख काळजे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा

युवा सेनेचे जिल्हाप्रमुख काळजे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा

Next

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील सिद्धेश्वर मुत्तुर (रा. दक्षिण सदर बझार, सोलापूर) यांनी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर टोल नाक्याजवळील पेट्रोल पंप धनश्री दत्तात्रय शिंदे (रा. तुळजापूर रोड, सोलापूर) यांच्याकडून दि. ५ मे २०१८ रोजी कायदेशीर व्यवहार करत कराराने चालवण्यासाठी घेतला होता. हा पेट्रोल पंप २५ ऑक्टोबर २०१९ पर्यंत मुत्तुर यांनी चालवला. परंतु, त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे पेट्रोल पंपाकडे त्यांना लक्ष देणे शक्य होत नसल्याने त्यांनी त्यांचे नातेवाईक मनीष अजय काळजे (रा. सोलापूर) यास हा पेट्रोल पंप दि. २५ ऑक्टोबर २०१९ रोजी करार तत्त्वावर चालवण्यासाठी दिला. काही कालावधीनंतर मुत्तुर यांनी मनीष काळजे याच्याकडे पेट्रोल पंपावरील हिशेब मागितला असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली व वेळ मारून नेली. तसेच पेट्रोल पंपाच्या बनावट चाव्यांचा सेट करून स्वतःकडे ठेवला. दरम्यान, जानेवारी २०२० मध्ये स्वप्नील मुत्तुर पेट्रोल पंपावर साहित्य पाहण्यासाठी गेले असता, पंपावरील इन्व्हर्टर - बॅटऱ्या व कॉम्प्युटर असा एकूण ७३ हजार रुपयांचे साहित्य परस्पर विकून टाकले. याप्रकरणी मनीष काळजे याच्याविरोधात ९ लाख १९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे करीत आहेत.

............

पंपावरील पैसे परस्पर वापरले

दि. ३ नोव्हेंबर २०१९ रोजी पंपावर मुत्तुर यांनी ८ लाख १६ हजार रुपयांच्या डिझेल टँकरचा लोड मनीष काळजे यास भरून दिला. त्यानंतर पेट्रोल पंपावरील मिळालेल्या उत्पन्नापैकी ८ लाख १६ हजार रुपये काळजे याने मुत्तुर यांना देण्याऐवजी स्वतःच्या फायद्याकरिता खर्च करून टाकले. याबाबत वारंवार विचारणा केल्यानंतर काळजे याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

Web Title: Fraud case against Yuva Sena district chief Kalje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.