शेतकऱ्यांची फसवणूक.. जलसंपदामंत्र्यांवर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:24 AM2021-05-27T04:24:09+5:302021-05-27T04:24:09+5:30

भीमानगर : उजनी धरण बचाव संघर्ष समितीच्या आंदोलनाची दखल घेऊन पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय रद्द केल्याचे जलसंपदामंत्री ...

Fraud of farmers .. File a case against the Minister of Water Resources | शेतकऱ्यांची फसवणूक.. जलसंपदामंत्र्यांवर गुन्हा दाखल करा

शेतकऱ्यांची फसवणूक.. जलसंपदामंत्र्यांवर गुन्हा दाखल करा

Next

भीमानगर : उजनी धरण बचाव संघर्ष समितीच्या आंदोलनाची दखल घेऊन पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय रद्द केल्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मीडियासमोर जाहीर केले. मात्र अद्याप लेखी आदेश प्राप्त झाले नाही. त्यांनी शासनाची व आंदोलनकर्त्यांची फसवणूक केली असून, त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जनहितचे प्रभाकर देशमुख यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली आहे.

उजनीचे पाणी इंदापूरला देण्याच्या प्रश्नावर जलसंपदामंत्र्यांनी लाखो शेतकऱ्यांसमोर पाणी देण्याचा आदेश रद्द केल्याचे जाहीर केले. मात्र आंदोलनकर्त्यांना लेखी पत्र न देणे कितपत योग्य आहे हे मुख्यमंत्र्यांनीच ठरवावे. अन्यथा टेंभुर्णी पोलीस स्टेशनसमोर १ जून रोजी हलगीनाद आंदोलन करण्यात येईल, असे सांगितले. आंदोलनकर्त्यांचे निवेदन आंदोलनस्थळी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अमित शितोळे यांनी स्वीकारले.

यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन बापू जगताप, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे, रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. सुहास पाटील सर, विठ्ठल आबा मस्के, सचिन पराडे पाटील, रामदास खराडे, मल्हारी गवळी, प्रंशात महाडिक, धवल पाटील, मंगेश वाघ, दादासोा. गायकवाड, अतुल भालेराव, अंकुश महाडिक, नारायण गायकवाड, तानाजी गायकवाड, सचिन गायकवाड, सिध्दार्थ भास्कर, दत्ता आरकिले, विजयराजे खराडे, संजय नवले, श्रीराम महाडिक, सौरभ आरकिले, अमोल पाटील, अकोले बु.चे सरपंच सतीश आबा सुर्वे, उपसरपंच बशीर मुलाणी, ग्रां. प. सदस्य कल्याण नवले, रमेश पवार, तुषार पाटील, सुजित दरगुडे उपस्थित होते.

----

१५ ग्रामपंचायतींचे ठराव

बेंबळे जि. प. सदस्य बंडूनाना ढवळे यांनी जि. प. गटातील १५ ग्रामपंचायतींचे ठराव सरपंचांसह उजनी धरणावर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी प्रत्यक्ष जाऊन देत पाठिंबा दिला. यावेळी आंदोलनकर्त्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.

----

Web Title: Fraud of farmers .. File a case against the Minister of Water Resources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.