खोटी प्रतिज्ञापत्र सादर करून वारसदारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:39 AM2021-02-06T04:39:29+5:302021-02-06T04:39:29+5:30

राजकुमार नारायण राठोड, धानू नारायण राठोड, महादेव नारायण राठोड असे तीन सख्खे भाऊ. महादेव राठोड हे ४ जून ९७ ...

Fraud of heirs by submitting false affidavits | खोटी प्रतिज्ञापत्र सादर करून वारसदारांची फसवणूक

खोटी प्रतिज्ञापत्र सादर करून वारसदारांची फसवणूक

Next

राजकुमार नारायण राठोड, धानू नारायण राठोड, महादेव नारायण राठोड असे तीन सख्खे भाऊ. महादेव राठोड हे ४ जून ९७ रोजी मयत झाले. त्यानंतर १० मार्च ११ रोजी या तिघांचे वडील नारायण राठोड यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर तोळणूर व गोपाळतांडा येथील जमीन, घर जागेच्या प्रॉपर्टीत तिघांची वारस लागणे आवश्यक होते. तसे न होता वरील ठिकाणची प्रॉपर्टी हडप करण्याच्या उद्देशाने राजकुमार राठोड व धानू राठोड यांनी तहसीलदारांसमोर खोटी प्रतिज्ञापत्र सादर करून आपलीच नावे नोंदवून घेतली आहेत. ही बाब फिर्यादीने काही दिवसांपूर्वी जमिनीचा उतारा काढून पाहिला असता उघडकीस आली. तेव्हा काकांना याबाबत विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिले. आपल्या कुटुंबाची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने वरील दोघांविरुद्ध दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोनाली महादेव राठोड यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय जाधव हे करीत आहेत.

Web Title: Fraud of heirs by submitting false affidavits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.