कोविड सेंटरमधून रुग्णांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:27 AM2021-08-17T04:27:24+5:302021-08-17T04:27:24+5:30

संपूर्ण रुग्णालयाची फेरतपासणी करण्यात यावी, त्याचबरोबर संबंधित रुग्णालयाचा किती मृत्युदर आहे याची माहिती मिळावी म्हणून रुग्ण हक्क परिषदेने उपोषण ...

Fraud of patients from Covid Center | कोविड सेंटरमधून रुग्णांची फसवणूक

कोविड सेंटरमधून रुग्णांची फसवणूक

Next

संपूर्ण रुग्णालयाची फेरतपासणी करण्यात यावी, त्याचबरोबर संबंधित रुग्णालयाचा किती मृत्युदर आहे याची माहिती मिळावी म्हणून रुग्ण हक्क परिषदेने उपोषण सुरू केलं होतं. यावर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने नायब तहसीलदार रविकिरण कदम यांनी यावर तातडीने निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

त्रिस्तरीय समितीची मागणी

२० लाख ४२ हजार २१४ रुपये या कोविड सेंटरकडून रुग्णांचे जादा घेतल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित सर्व रुग्णालयाचे सन २०१९ ते २०२१ पर्यंतचे शासकीय दुबार लेखापरीक्षण करावे,जादा वाढलेली रक्कम ही रुग्णांना परत द्यावी, फसवणूक केल्याने सेंटर तपासणीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमावी, असे म्हटले आहे.

यावेळी त्यांना मनसेच्या विद्यार्थी संघटना, आरपीआय, रेणुका तृतीयपंथी सामाजिक संस्था, रासप, भाजपा, हिंदू खाटीक संघटना, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असोसिएशन, काँग्रेस अल्पसंख्याक सेल, आपले मानवाधिकार फाउंडेशन यांनी पाठिंबा दिला. उपोषणात रुग्ण हक्क परिषदेचे जिल्हा अध्यक्ष संजय लोहार, तालुका अध्यक्ष आकाश घोडके, तालुका उपाध्यक्ष जॉन नवगिरे, तालुका संघटक रमेश मोटे, सचिव चेतन शिंदे यांनी सहभाग नोंदवला होता.

---

आधारमध्येच १७ लाख ६७ हजार ९ रुपयांचा फरक

आमच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपकोषागार अधिकाऱ्यांनी केलेल्या लेखापरीक्षणात १७ लाख ६७ हजार ९ रुपयांचा रुग्णांच्या बिलात फरक आढळलेला आहे. तो आम्ही शासकीय नियमानुसार रुग्णांना परत करीत असल्याचे कुर्डूवाडी येथील आधार कोविड सेंटरच्या व्यवस्थापन मंडळाच्या वतीने लोकमतशी बोलताना सांगण्यात आले.

---

फोटो १६ कुर्डूवाडी

कुर्डूवाडी शहर व माढा तालुक्यातील कोविड सेंटरने रुग्णांची पैशात फसवणूक केल्याप्रकरणी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले रुग्ण हक्क परिषदेचे पदाधिकारी.

160821\img-20210816-wa0227.jpg

रुग्ण हक्क परिषद उपोषण फोटो

Web Title: Fraud of patients from Covid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.