खोट्या सह्यांद्वारे केली ३.६० कोटींची फसवणूक; दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:18 AM2020-12-26T04:18:22+5:302020-12-26T04:18:22+5:30

जुनोनी-काळूबाळूवाडी येथील अंकुश मनोहर कांबळे यांच्या मालकी वहिवाटीची जमीन गट नं. १८० या मिळकतीचे त्यांच्या भावकीतील लोकांमध्ये अद्याप वाटप ...

Fraud of Rs 3.60 crore through forged signatures; Filed a case against ten | खोट्या सह्यांद्वारे केली ३.६० कोटींची फसवणूक; दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

खोट्या सह्यांद्वारे केली ३.६० कोटींची फसवणूक; दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next

जुनोनी-काळूबाळूवाडी येथील अंकुश मनोहर कांबळे यांच्या मालकी वहिवाटीची जमीन गट नं. १८० या मिळकतीचे त्यांच्या भावकीतील लोकांमध्ये अद्याप वाटप झालेले नाही. या जमिनीमधून सांगली-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ गेलेला असल्याने भूसंपादन झाली आहे. त्यासंदर्भात भूसंपादन झालेल्या मोबदल्याची नोटीस त्या गटाशी संबंधित असणाऱ्या सर्व व्यक्तींना त्यांच्या नावे भूसंपादन मोबदला ३ कोटी ६० लाख २४ हजार १०२ रुपये अशी नमूद करून एकत्रित पाठविल्या होत्या.

सदर नोटिसीमध्ये फिर्यादीचे वडील मनोहर कांबळे यांचे नावदेखील नमूद होते. दरम्यान, नोटीस मिळाल्यानंतर तानाजी मारुती कांबळे यांनी स्वतःच्या नावे १०० रुपयांचा स्टॅम्प घेऊन संजय अशोक कांबळे, नवनाथ सोपान कांबळे, सुवर्णा सुधाकर कांबळे, अनिता केशव कांबळे, सदाशिव बापू कांबळे, विठ्ठल दामू कांबळे, कुमार तातोबा कांबळे, शशिकांत मनोहर कांबळे, गोरक्ष सखाराम कांबळे, सर्वजण अंकुश कांबळे यांचा भाऊ नंदकुमार, प्रफुल्ल व आई तुळसाबाई यांच्या घरी येऊन तुम्हाला तुमच्या मोबदल्याची रक्कम द्यायची आहे. त्यासाठी फोटो, आधारकार्ड छायांकित प्रती जोडून घेऊन गेले.

शेजारील भावकीतील त्या दहा जणांनी मिळून संगनमताने फसवणूक करण्याच्या हेतूने त्यांच्याकडून घेतलेले फोटो तानाजी कांबळे यांच्या नावे घेतलेल्या स्टॅम्पवर चिटकवून त्यास आधारकार्ड प्रती जोडून त्या स्टॅम्पवर जमीन गट नं. १८० मधील रस्त्याकरिता संपादित झालेल्या भूसंपादनाची सुमारे ३ कोटी ६० लाख २४ हजार १०२ रुपये लिहून घेणार तानाजी कांबळे देण्यास हरकत नाही, त्यास आमची सहमती आहे. असा आशयाचा खोटा, बनावट मजकूर फसवणूक करण्याच्या हेतूने नमूद करून लिहून घेणार म्हणून फिर्यादीचा भाऊ नंदकुमार, प्रफुल्ल व तुळसाबाई यांची नावे नमूद केली आहेत. त्यांच्या नावापुढे फोटो चिटकवून डुप्लिकेट सह्या व अंगठे केले.

सदर स्टॅम्पवर सुरुवातीला कार्यकारी दंडाधिकारी तथा मंडलाधिकारी सांगोला यांच्यासमोर नमूद केले. त्यावर कार्यकारी दंडाधिकारी कोळा यांची सही घेऊन ओळख म्हणून आमिर आतार यांची स्वाक्षरी घेतली. सदर घेतलेल्या स्टॅम्पवरील डुप्लिकेट सह्या फसवणूक करण्याच्या हेतूने अंकुश कांबळे यांची रक्कम हडप करण्याच्या हेतूने सक्षम प्राधिकारी भूसंपादन यांच्याकडे देऊन फिर्यादीची परस्पर रक्कम हडप केली आहे. दरम्यान, अंकुश कांबळे यांनी चौकशी केली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला. संबंधितांना विचारणा केली असता ते सर्वजण शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी देत आहेत. याबाबत अंकुश कांबळे सांगोला पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी फिर्याद घेतली नाही. म्हणून त्यांनी थेट पोलीस अधीक्षक सोलापूर यांच्याकडे धाव घेऊन सांगोला पोलीस फिर्याद घेत नसल्याचे सांगितले. दरम्यान, अंकुश कांबळे यांनी वकिलामार्फत सांगोला न्यायालयात प्रतिज्ञापत्रावर लिहून फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Fraud of Rs 3.60 crore through forged signatures; Filed a case against ten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.