अँगल खरेदीत चार लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:56 AM2021-01-13T04:56:09+5:302021-01-13T04:56:09+5:30
याबाबत सुचिता महावीर शेळके यांनी तालुका पोलिसात बाळासाहेब मोरे व सचिन उर्फ मारुती चंद्रकांत भोर (रा. ग्रीन पार्क, विद्यानगरी, ...
याबाबत सुचिता महावीर शेळके यांनी तालुका पोलिसात बाळासाहेब मोरे व सचिन उर्फ मारुती चंद्रकांत भोर (रा. ग्रीन पार्क, विद्यानगरी, बारामती) यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी महिलेचे पती वन विभागात नोकरीस असल्याने या दुकानाचा सर्व व्यवहार फिर्यादी पाहतात. गेल्या महिन्यात खरेदीसाठी आल्यानंतर सचिन घाडगे (रा. सालसे) याने द्राक्ष बागेसाठी ७ टन लोखंडी अँगल खरेदी करावयाचे आहेत, पण त्याचे पैसे माल पोहोच झाल्यानंतर देतो, असे सांगितले. त्यानुसार ट्रकमधून ४ लाख रुपये किमतीचे ७ टन लोखंडी अँगल सांगितलेल्या ठिकाणी पोहोच केले. माल उतरवल्यानंतर पैसे रोख न देता त्याबाबत त्यांनी ॲक्सेस बँक बारामती शाखेचा २ लाख ८० हजारांचा धनादेश देऊन राहिलेले रोख दुकांनी घेऊन येतो, असे म्हटल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर तो चेक बँकेत जमा करण्यास दिला असता तो कालबाह्य झाल्याचे व खात्यात बॅलन्स नसल्याचे समजले. फिर्यादी महिलेच्या पतीने त्याची चौकशी केली असता संबंधित दोघांची नावे समजली. फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांनी कालबाह्य झालेला चेक दिला. त्यामुळे त्यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दिली.