‘फोन पे’ वरून पावणेतीन लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:19 AM2021-01-02T04:19:11+5:302021-01-02T04:19:11+5:30

हा प्रकार ३० ते ३१ डिसेंबर या कालावधीत बामणी (ता. सांगोला) येथे घडला. राजेश नाना पांढरे यांनी फसवणूक करणाऱ्या ...

Fraud of Rs 53 lakh from 'Phone Pay' | ‘फोन पे’ वरून पावणेतीन लाखांची फसवणूक

‘फोन पे’ वरून पावणेतीन लाखांची फसवणूक

Next

हा प्रकार ३० ते ३१ डिसेंबर या कालावधीत बामणी (ता. सांगोला) येथे घडला. राजेश नाना पांढरे यांनी फसवणूक करणाऱ्या ०९८८३९०३१९७ या मोबाइलधारकाच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे.

बामणी (ता. सांगोला) येथील राजेश पांढरे यांचे सांगोल्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत खाते आहे. या खात्याला ‘फोन पे’ जोडले आहे. ३० डिसेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास मित्र दत्तात्रय बंडगर याने तुझ्या मोबाइलमधील ‘फोन पे’वरून माझ्या अकाउंटवर ६ हजार रुपये पाठव, असे सांगितल्यावरून त्यांने पैसे पाठविले ; परंतु ते त्याच्या ‘फोन पे’ वर जमा झाले नाहीत. म्हणून पांढरे यांनी ‘फोन पे’ कस्टमर केअरशी संपर्क साधला. यावेळी ०९८८३९०३१९७ हा नंबर सर्च झाला. त्यांनी या नंबरवर फोन लावला असता तो समोरच्या व्यक्तीने उचलला. यावेळी पांढरे यांनी ‘फोन पे’वरून पाठविलेले ६ हजार रुपये मित्राच्या खात्यावर जमा न होता माझ्या खात्यातून कमी झाल्याची तक्रार द्यायची आहे, असे बोलून झाल्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील, असे स्पष्ट केले, आणि त्या व्यक्तीने फोन चालू ठेवून मोबाइलमधील प्ले स्टोअरमधून टीमव्हीव्हर पे डाऊनलोड करण्यास सांगितले. आणि फसवणूक केली. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. अधिक तपास सुरु आहे.

अशी केली फसवणूक

टीम व्हीव्हर पे मध्ये सांगितलेला पासवर्ड आयडी टाकून त्या व्यक्तीने परस्पर टप्प्याटप्प्ययाने ३० व ३१ डिसेंबर या कालावधीत २४ हजार ९९९, १ लाख, ५० हजार, १० हजार, १५ हजार, ५० हजार, २५ हजार असे एकूण २ लाख ७४ हजार ९९९ रुपयांची रक्कम काढून घेतली. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी सांगोला येथील एसबीआय शाखेत धाव घेऊन त्या खात्यावरील व्यवहार बंद करण्यास सांगितले.

Web Title: Fraud of Rs 53 lakh from 'Phone Pay'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.