पोस्ट कोविड रुग्णांची मोफत तपासणी अन् औषधेही वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:23 AM2021-05-26T04:23:16+5:302021-05-26T04:23:16+5:30
बीबीदारफळमध्ये कमी कालावधीत अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली. यातून बरे झालेल्यांसाठीही आहार, औषधे व व्यायाम याची माहिती देण्यात आली. ...
बीबीदारफळमध्ये कमी कालावधीत अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली. यातून बरे झालेल्यांसाठीही आहार, औषधे व व्यायाम याची माहिती देण्यात आली. रुग्णांची मोफत तपासणी व औषधे देण्यात आली. बीबीदारफळमध्ये डाॅ. ननवरे हे कोरोना झालेल्यांनी काय करावे, कोणते उपचार घ्यावेत, आजार वाढू नये यासाठी काय करावे? यावर गेल्या महिन्यापासून मार्गदर्शन करीत आहेत.
शारदा प्रतिष्ठानचे डाॅ. प्रवीण ननवरे, डाॅ. मंजूषा ननवरे, तसेच सुमित बारडोळे, गौरी म्हमाणे यांनी शुगर, ईसीजी तपासणी करून औषधे दिली.
शिबिरासाठी शीला ननवरे, शैलेश साठे, ओंकार सावंत, विनायक ननवरे, सचिन साठे, सचिन बारसकर व अजित चौरे आदींनी शिबिराला सहकार्य केले.
----
बरे झालेल्या दोघांचा मृत्यू
कोरोनातून बरे होऊन घरी आलेले संभाजी निवृत्ती साठे व हणमंत गणपत साठे हे दोघे कोरोनावर मात करून ठणठणीत बरे होऊन घरी आले होते. दोन दिवसांनंतर त्रास जाणवू लागल्याने ते पुन्हा सोलापूर येथील दवाखान्यात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळेच पोस्ट कोविडबाबतीतही दक्ष राहण्याची गरज असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
---
२३ बीबीदारफळ
पोस्ट कोविड रुग्णांना शारदा प्रतिष्ठानच्या वतीने मोफत तपासणी व औषधे देण्यात आली. यावेळी डाॅ. प्रवीण ननवरे, डाॅ. मंजूषा ननवरे, सुमित बारडोळे, शैलेश साठे, सचिन साठे आदी.