आंध्रतील सहाशे किलोमीटर खडतर पदयात्रेतील भक्तांच्या हाती मोफत औषधं
By रेवणसिद्ध जवळेकर | Published: March 23, 2023 08:41 AM2023-03-23T08:41:06+5:302023-03-23T08:42:51+5:30
डोंगरातील वाट सुखकर: पाचशे भाविकांच्या आरोग्याची काळजी
रेवणसिद्ध जवळेकर, सोलापूर : सुमारे ६०० किलोमीटर इतके सोलापूर-श्रीशैल (आंध्र प्रदेश) पदयात्रेत सहभागी झालेल्या आणि त्यांना पुढील खडतर प्रवास सुखकर होण्यासाठी वीरशैव व्हिजनने २५ हजार रुपयांची मोफत औषधं देऊन त्यांच्या हाती देऊन त्यांची पुढील वाट सुखकर केली आहे. गेल्या १० वर्षांपासूनची ही परंपरा यंदाही व्हीजनने कायम राखली आहे.
ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर आपले गुरु श्री मल्लिकार्जुन यांच्या दर्शनासाठी सोन्नलगीहून श्रीशैलपर्यंत पायी चालत गेले होते. त्याचप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त श्री मल्लिकार्जुन यांचे दर्शन घेण्यासाठी सोलापूरहून हजारो भाविक पायी चालत श्रीशैलपर्यंत जातात. सोन्नलगी श्रीशैलम पदयात्रा भक्त मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून वेदमूर्ती राजशेखर स्वामी आहेरवाडीकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ४६ वर्षापासून ही पदयात्रा काढण्यात येते. विजयकुमार बिराजदार यांच्या हस्ते गंगाधर झुरळे व महेश स्वामी यांच्या उपस्थितीत पदयात्रा प्रमुख श्रीशैल हिरेमठ यांच्याकडे औषधांचे बॉक्स देण्यात आले.
सोलापुरातून पदयात्रा निघताना ५०० भाविक असतात तर गुढीपाडव्याच्या आदल्यादिवशी अमावस्येला श्रीशैलला पोहोचेपर्यंत या पदयात्रेत ३ हजार भाविक सहभागी होतात. महिनाभर चालणाऱ्या या पदयात्रेत भाविकांना डांबरी रस्त्याबरोबरच जंगलातील खडतर वाटेवरून ऊन, वारा आणि पाऊस झेलत मार्गक्रमण करावे लागते. वाटेत आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नये म्हणून हा उपक्रम राबवण्यात येतो. यावेळी औषध विक्रेते उमाशंकर डुमणे, औषध विक्री प्रतिनिधी रवींद्र आमणे, सचिन सणकळळी, बद्रीशकुमार कोडगे, जनार्दन हौसे, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, चिदानंद मुस्तारे, सिद्राम बिराजदार, नागेश बडदाळ, संजय साखरे, आनंद दुलंगे, शिवानंद सावळगी, राजेश नीला, सोमेश्वर याबाजी, विजयकुमार हेले, सोमनाथ चौधरी, सचिन विभुते, अविनाश हत्तरकी, शिव कलशेट्टी, अमोल कोटगोंडे उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"