अक्कलकोटमध्ये ५१ मातांची मोफत बिनटाक्याची शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:39 AM2021-02-18T04:39:06+5:302021-02-18T04:39:06+5:30
तसेच अल्पावधीत ग्रामीण रुग्णालयाचे रूप पालटणारे डॉ. अशोक राठोड यांना राज्यस्तरीय मानवता रुग्णसेवा पुरस्काराने पूज्य बसवलिंग महास्वामी यांच्याहस्ते सन्मानित ...
तसेच अल्पावधीत ग्रामीण रुग्णालयाचे रूप पालटणारे डॉ. अशोक राठोड यांना राज्यस्तरीय मानवता रुग्णसेवा पुरस्काराने पूज्य बसवलिंग महास्वामी यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी उद्योगपती काशिनाथ गोळे होते.
यावेळी नीलकंठ कापसे, अरुण जाधव, बसवराज अलोळी, सिकंदर शेख, विरेश भंगर्गी उपस्थित होते.
प्रास्ताविक आयोजक स्वामिनाथ हरवाळकर यांनी केले. यावेळी वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, युवक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्राचार्य नागनाथ सुरवसे, तम्मा शेळके, अस्लम बागवान, धर्मा गुंजले यांना शिवसन्मान पुरस्काराने सन्मानित केले. तसेच पाचशे रुग्णांची तपासणी करून मोफत औषध-गोळ्या वाटप केल्या.
फोटो
१७अक्कलकोट-शिबिर
ओळी
अक्कलकोट येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. अशोक राठोड यांना पुरस्कार देऊन सन्मानित करताना बसवलिंग म्हास्वामी, स्वामिनाथ हरवाळकर, अरुण जाधव, काशिनाथ गोळ्ळे.