बार्शी आगारात वाहतूक सुरक्षा सप्ताहात मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:43 AM2021-02-21T04:43:17+5:302021-02-21T04:43:17+5:30
नेत्र शिबीर ; ७८ जणांची तपासणी अन् औषधोपचार बार्शी : राज्य परिवहन महामंडळाच्या बार्शी बस आगराच्या ...
नेत्र शिबीर ; ७८ जणांची तपासणी अन् औषधोपचार
बार्शी : राज्य परिवहन महामंडळाच्या बार्शी बस आगराच्या वतीने घेण्यात आलेल्या
अपघात सुरक्षितता सप्ताहाच्या निमित्ताने मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात येऊन त्यात ७८ जणांची तपासणी करण्यात येऊन त्याच्यावर मोफत औषधोपचार करण्यात आले.
दरवर्षी अशा शिबिराचे आयोजन या सुरक्षा सप्ताहा निमित्त होते. या वर्षी घेण्यात आलेल्या या शिबिरात नेत्र तज्ज्ञ डॉ. अमर खेंदाड व त्यांचे सहकारी स्वप्नील उबाळे यांनी एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांची मोफत तपासणी केली व औषधोपचार करण्यात आले. यावेळी सुमारे ७८ जणांनी शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी आगार व्यवस्थापक मोहन वाकळे,बस स्थानक प्रमुख स्मिता मिसाळ, आगार लेखाकार, विजय बुटे,वाहतुक निरीक्षक नितीन गावडे, जयसिंग परदेशी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महेंद्र क्षीरसागर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेंद्र क्षीरसागर,पंकज सावंत, पुरुषोत्तम वाघुलकर, कल्याण सुतकर, उमेश भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले.
----