त्याच त्या रस्त्यांसाठी वारंवार निधी, ठेकेदारही ठरलेलेच, कामे दर्जाहीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:27 AM2021-09-15T04:27:30+5:302021-09-15T04:27:30+5:30
उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी निधी मिळतो, मात्र काम गुणवत्तेचे होत नाही. याशिवाय सगळी कामे आपल्यालाच मिळावीत, यासाठी बिलोने ...
उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी निधी मिळतो, मात्र काम गुणवत्तेचे होत नाही. याशिवाय सगळी कामे आपल्यालाच मिळावीत, यासाठी बिलोने निविदा भरण्यासाठी स्पर्धा केली जाते. ठेकेदारांनी एकत्रित बसून निविदा दराने कामे विभागून घेतली. तरीही गुणवत्तेची कामे ठरावीकच ठेकेदार करतात. ग्रामीण भागात फिरताना उखडलेले व खड्डे पडलेले रस्ते पाहिले की कोणत्या ठेकेदाराने काम केले, हा प्रश्न उपस्थित होतो. मग ठरावीक ठेकेदाराचे नाव समोर येते. ही बाब लक्षात आल्याने आमदार सुभाष देशमुख यांनी पाकणी तर आमदार यशवंत माने यांनी अकोलेकाटी येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात गुणवत्ता हरवत चालल्याचे जाहीररीत्या सांगितले.
.....................
चौकट
शरद सूत मिल ते रानमसले, वडाळा ते पडसाळी, तरटगाव ते एकरुख व बीबीदारफळ ते खुनेश्वर या रस्त्यांसाठी ९० लाख रुपये निधी असताना ६९ लाख ६० हजार रुपयांचा निधी ठेकेदाराने घेतला.
कोंडी-अकोलेकाटी-सावंतवाडी हा रस्ता ३२ टक्के बिलोने ठेकेदार काम करीत आहे. यामुळे कामात गुणवत्ता राहत नसावी, असा संशय लोकप्रतिनिधींनी गुणवत्तेचा मुद्दा उपस्थित केला.
बारसकर वस्ती ते गणेशवाडी या रस्त्याचे काम केल्यानंतर खडी उखडल्याने रस्त्यावरून जाताही येत नाही. बांधकाम खात्याने ठेकेदाराला नोटीस दिली तर ठेकेदाराने जुमानलेही नाही. नागरिकांचे हाल मात्र कायम आहेत.