तहसीलसमोर चूल मांडून स्वयंपाक महिलांचा महागाईविरोधात हलगीनाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:40 AM2021-02-06T04:40:21+5:302021-02-06T04:40:21+5:30
या आंदोलनात शिवसेनेच्या महिला तालुकाध्यक्षा प्रियंका गायकवाड, भावना गांधी यांनी चुलीवर चपात्या भाजून त्या चपात्या केंद्र शासनाला पाठवा म्हणत ...
या आंदोलनात शिवसेनेच्या महिला तालुकाध्यक्षा प्रियंका गायकवाड, भावना गांधी यांनी चुलीवर चपात्या भाजून त्या चपात्या केंद्र शासनाला पाठवा म्हणत तहसील कार्यालयाच्या ताब्यात दिल्या. सेनेचे करमाळा तालुका संपर्कप्रमुख बापूराव मोरे, उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, भरत अवताडे, युवा सेनेचे शहर प्रमुख विशाल गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष मयुर यादव, उपशहरप्रमुख संतोष गानबोटे, युवा सेनेचे माजी तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे, माजी शहर प्रमुख संजय शीलवंत, उपशहर प्रमुख राजेंद्र काळे, डॉ. अमोल घाडगे, युवराज भोसले, अविनाश भिसे, सागर गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, भरत आवताडे,महिलाध्यक्ष प्रियंका गायकवाड यांची भाषणे झाली. या आंदोलनानंतर मुंबईहून आलेले सेनेचे संपर्कप्रमुख बापुराव मोरे यांनी शिवसैनिकांच्या कार्याचा आढावा घेऊन संपूर्ण अहवाल सेना भवन येथे सादर करणार असल्याचे सांगितले.
शिवसेनेतील गटबाजीचे दर्शन
शिवसेनेच्यावतीने आयोजित इंधन दरवाढ आंदोलन प्रसंगी तालुका प्रमुख सुधाकर लावंड, संघटक संजय शिंदे व शहर प्रमुख प्रवीण कटारिया आदींनी तहसिल समोरील आंदोलनात सहभागी न होता थेट तहसिल कार्यलयात जाऊन निवासी नायब तहसिलदार जाधव यांना निवेदन दिले.
--
फोटो ओळी : ०५करमाळा-आंदोलन सेना
करमाळ्यात शिवसेनेच्यावतीने तहसील कार्यालयासमोर आयोजित इंधन दरवाढ आंदोलनात सहभागी शिवसैनिक.