उपवास करताना ऊर्जा वाढविणारी मेवा-मिठाई येते हैदराबाद, मुंबई, पुण्यातून

By काशिनाथ वाघमारे | Published: April 9, 2023 05:01 PM2023-04-09T17:01:13+5:302023-04-09T17:01:30+5:30

यंदा चारोळी, पिस्ता, अक्रोड वगळता इतर वस्तूंचे दर नियंत्रणात असल्याचे व्यापारी साकीब बागवान यांनी सांगितले.

Fruit-sweets that boost energy while fasting come from Hyderabad, Mumbai, Pune | उपवास करताना ऊर्जा वाढविणारी मेवा-मिठाई येते हैदराबाद, मुंबई, पुण्यातून

उपवास करताना ऊर्जा वाढविणारी मेवा-मिठाई येते हैदराबाद, मुंबई, पुण्यातून

googlenewsNext

सोलापूर : रमजान महिन्यातील कडक उपवास करीत असताना शरीराला ऊर्जा आवश्यक असते. ही ऊर्जा देणारी काजू, बदाम, चारोळी, पिस्तासह अनेक मेवा-मिठाई सोलापूरकरांना मिळते हैदाराबाद, मुंबई, पुण्यातून. हीच मेवा-मिठाई सोलापुरातून मराठवाडा आणि कर्नाटकातही जाते. यंदा चारोळी, पिस्ता, अक्रोड वगळता इतर वस्तूंचे दर नियंत्रणात असल्याचे व्यापारी साकीब बागवान यांनी सांगितले.

रमाजान महिन्यातील उपवास हे थंड, पाणीदार फळांनी सोडतात. याबरोबरच मेवा-मिठाईचीही गरज भासते. सोलापूर शहरात किडवाई चौकात या वस्तूंचे स्टॉल मोठ्या प्रमाणात लागले असून, अख्ख्या शहराला येथून पुरवठा होतो. यंदाही काही वस्तू वगळता पुरवठा असून, त्यांचे दरही स्थिर आहेत. पुणे, मुंबईतून या साहित्यांची आवक आहे. हेच साहित्य सोलापुरातील व्यापाऱ्यांकडून कर्नाटकात गुलबर्गा, विजयपुरा, आळंद, मराठवाड्यात उस्मानाबाद, लातुरात जाते. सोलापुरात मंद्रुपसह भोवतालच्या गावांत हे साहित्य विक्रीला जाते.

असे आहेत दर...
काजू : २४० रु. पावकिलो
बदाम : २४० रु. पावकिलो
चारोळी : ४०० रु. पावकिलो
पिस्ता : ६०० रु. पावकिलो
खिसमिस : १२० रु. पावकिलो
अक्रोड : ३५० रु. पावकिलो
खजूर : ११० रु. पावकिलो
काबुली : १४० रु. पावकिलो
खसखस : ८० रु. छटाक
बडीशेप : ८० रु. छटाक
इलायची : ६०० रु. पावकिलो
शहाजिरा : १३० रु. पावकिलो
दालचिनी : ९० रु. पावकिलो
लवंग : २४० रु. पावकिलो
दूध शेवया : २२० रु. किलो

Web Title: Fruit-sweets that boost energy while fasting come from Hyderabad, Mumbai, Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.