ST कर्मचाऱ्यांच्या संपाला मनसेचा फुल्ल सपोर्ट, आक्रोश मोर्चातून सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 06:04 PM2021-12-16T18:04:25+5:302021-12-16T18:13:57+5:30
सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ करुन हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला. तसेच, कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी वारंवार सरकारने आवाहन देखील केले.
एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण व्हावे यामागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या दिड महिन्यांपासून संप पुकारला आहे. त्यामुळे एसटीची सेवा पुर्णता कोलमडली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे प्रवासांचे हाल होत आहेत. तर दुसरीकडे खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून प्रवासांची लुट होत असल्याचे समोर आले आहे. त्यातच, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीला जोर देत मनसेनं संपकरी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला आहे. सोलापुरात मनसेनं आज आक्रोश मोर्चा काढून सरकाविरुद्ध आवाज उठवल्याचे दिसून आले.
सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ करुन हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला. तसेच, कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी वारंवार सरकारने आवाहन देखील केले. तरी देखील कर्मचारी एसटी विलिनीकरणाच्या आपल्या मागण्यावर ठाम आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र, काहीही झालं तरी विलिगीकरण केल्याशिवाय संप मागे घेणार नाही, अशी भूमिका संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेला आता मनसेनं फुल्ल सपोर्ट दिला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील सर्व एस. टी. कर्मचाऱ्यांचे शासनामध्ये विलीनीकरण करून घेण्यात यावे यासाठी संप, उपोषण ,जागरण आंदोलन सुरु आहे, निद्रा अवस्थेत असण्याऱ्या महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. pic.twitter.com/i5G4YuN7Zh
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) December 16, 2021
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील सर्व एस. टी. कर्मचाऱ्यांचे शासनामध्ये विलीनीकरण करून घेण्यात यावे यासाठी संप, उपोषण ,जागरण आंदोलन सुरु आहे. मात्र, निद्रा अवस्थेत असण्याऱ्या महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात मनसैनिक हजर होते.
परब यांनी कर्मचाऱ्यांना दिला इशारा
एस. टी. ही सर्वसामान्य माणसांसाठी आहे. ती अत्यावश्यक सेवा असल्याने संपकरी कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर हजर व्हावे यासाठी मेस्मा कायदा लावता येऊ शकतो. त्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी रत्नागिरीत सांगितले. कोणी नेता नसल्याने संपकरी कर्मचारी भरकटले आहेत. त्यांचे वकील गुणवंत सदावर्ते त्यांना सांगत आहेत की २० तारखेला विलिनीकरणाचा निर्णय होईल. पण ते हे कशाच्या आधारे बोलत आहेत, हे माहिती नाही. त्या दिवशी न्यायालयाला समितीचा अहवाल सादर होईल. निर्णय होणार नाही, असेही मंत्री परब म्हणाले.