पाणीपुरवठ्यासाठी १० कोटीचा निधी वाढविला,अन् अंदाजपत्रकात मनपा हिस्सा खर्च कमी केला

By Appasaheb.patil | Published: March 3, 2023 08:01 PM2023-03-03T20:01:34+5:302023-03-03T20:01:50+5:30

सोलापूर महापालिकेच्या १०७५.१९ कोटीच्या नियमित अंदाजपत्रकास प्रशासकांची मान्यता

Fund of 10 crores was increased for water supply, and municipal share expenditure was reduced in the budget | पाणीपुरवठ्यासाठी १० कोटीचा निधी वाढविला,अन् अंदाजपत्रकात मनपा हिस्सा खर्च कमी केला

पाणीपुरवठ्यासाठी १० कोटीचा निधी वाढविला,अन् अंदाजपत्रकात मनपा हिस्सा खर्च कमी केला

googlenewsNext

सोलापूर :सोलापूर महापालिकेच्या सन २०२२-२३ चे सुधारीत व सन २०२३ - २४ च्या १ हजार ७५ कोटी १९ लाख ४ हजार ४०१ रुपयांच्या नियमित अंदाजपत्रकास सर्वसाधारण सभा म्हणजेच प्रशासकांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शितल तेली उगले यांनी आज दिली. यात मनपा हिस्सा कमी करून पाणीपुरवठ्यासाठी १० कोटींचा निधी वाढविला आहे.

सोलापूर महानगरपालिकेचे सन २०२२-२३ चे सुधारीत व सन २०२३ - २४ चे नियमित अंदाजपत्रक हे स्थायी समितीकडे मंजुरीसाठी त्यानंतर सर्वसाधारण सभेकडे मान्यतेस्तव शिफारस करण्यासाठी २० फेब्रुवारी २०२३ रोजी सादर करण्यात आलेले होते. त्यास स्थायी समिती ठराव क्र. १८९ दि. २३ फेब्रुवारी २०२३ अन्वये फेर बदलासह महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ९६ अन्वये सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी सादर केलेले आहे. त्यास सर्वसाधारण सभेने म्हणजेच प्रशासकांनी आज मान्यता दिली आहे. महसुली जमा व महसुली खर्चाच्या एकूण रक्कमेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

परिवहन समितीच्या ५९.३१ कोटीच्या अंदाजपत्रकास मंजुरी

परिवहन समिती यांनी सूचविलेल्या ५९ कोटी ३१ लाख ८२ हजार ६४१ रुपये (३५ बसेस) रुपये इतक्या एकूण जमा व खरच प्रशासकांनी मंजुरी दिली आहे, असेही महापालिका प्रशासक शितल तेली - उगले यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Fund of 10 crores was increased for water supply, and municipal share expenditure was reduced in the budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.