पंढरपूर, माळशिरस तालुक्यातील रस्ते दुरुस्तीसाठी दोन कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:20 AM2021-05-16T04:20:38+5:302021-05-16T04:20:38+5:30
भीमानगर : जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत अतिवृष्टीत खराब झालेल्या रस्त्यांसाठी पंढरपूर व माळशिरस तालुक्यांतील रस्त्यांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी ...
भीमानगर : जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत अतिवृष्टीत खराब झालेल्या रस्त्यांसाठी पंढरपूर व माळशिरस तालुक्यांतील रस्त्यांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.
माढा मतदारसंघातील पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचा समावेश आहे.
खेड-भोसे ते दडगळ वस्ती रस्ता (२२ लाख), देवडे ते प्रजिमा ८१ ला मिळणारा रस्ता (देवडे पाटी) (२५ लाख), राज्यमार्ग ते चिलाईवाडी रस्ता (१५ लाख), व्होळे ते कोक नदी रस्ता रक्कम (११ लाख), करोळे ते कान्हापुरी रस्ता (२४ लाख), सुस्ते ते देशमुख वस्ती रस्ता (१० लाख), माळशिरस तालुक्यात जांभुड ते मिरे रस्ता (१५ लाख), माळखांबी विठ्ठलवाडी ते लोखंडे वस्ती रस्ता (१५ लाख), उजनी कॅनॉल ते घरमालकर, भिलारे, वाघ वस्ती रस्ता (१५ लाख), म्हाळुंग ते तांबवे रस्ता रक्कम (१५ लाख), महाळुंग हदके वस्ती ते मुंडफणे मळा रस्ता रक्कम (१५ लाख) आदी रस्त्यांना निधी मंजूर झाला आहे.
----