माळशिरस तालुक्यातील सात रस्त्यांसाठी २४ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:23 AM2021-05-26T04:23:21+5:302021-05-26T04:23:21+5:30

माळशिरस तालुक्यातील विविध गावातील रस्त्यांचा विकास आणि मजबुतीकरण व्हावे, यासाठी पंतप्रधान सडक योजनेतून निधी मिळावा, यासाठी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील ...

Fund of Rs. 24 crore for seven roads in Malshiras taluka | माळशिरस तालुक्यातील सात रस्त्यांसाठी २४ कोटींचा निधी

माळशिरस तालुक्यातील सात रस्त्यांसाठी २४ कोटींचा निधी

Next

माळशिरस तालुक्यातील विविध गावातील रस्त्यांचा विकास आणि मजबुतीकरण व्हावे, यासाठी पंतप्रधान सडक योजनेतून निधी मिळावा, यासाठी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पाठपुरावा केला होता. माळशिरस तालुक्यातील सात रस्त्यांमधील ३२.४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामांसाठी केंद्रीय ग्रामविकास विभागामार्फत २४ कोटी ३४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

यामध्ये गिरझणी - संग्रामनगर या ४.१०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी २ कोटी ५५ लाख, श्रीपूर - खंडाळी या ७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ५ कोटी ५ लाख, वेळापूर ते महाळुंग या ७.५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ५ कोटी ९५ लाख, खुडूस - पाणीव - विझोरी या ३.५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी २ कोटी ९३ लाख, खंडाळी - श्रीपूर या ३.५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी २ कोटी ६० लाख आणि माळखांबी जांबूड या ३.३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी दोन कोटी ५७ लाख असे मिळून या ७ रस्त्यांसाठी २४ कोटी ३४ लाख मंजूर झाले आहेत.

जिल्हा नियोजन समितीमार्फत तालुक्यातील अनेक रस्त्यांच्या विकासासाठी नुकताच निधी मंजूर झाला आहे. त्यानंतर आता या ७ रस्त्यांसाठी हा भरीव निधी मंजूर झाल्याने या रस्त्यांचे विशेष मजबुतीकरण होणार असल्याचे आ. मोहिते-पाटील यांनी सांगितले.

Web Title: Fund of Rs. 24 crore for seven roads in Malshiras taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.