संघर्षातून निधी मिळाला, कामे गुणवत्तेची करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:26 AM2021-08-12T04:26:24+5:302021-08-12T04:26:24+5:30
पाकणी फाटा ते गावापर्यंत १२ कोटी ५० लाख रुपये खर्चाच्या पाच किलोमीटर सिमेंट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. ...
पाकणी फाटा ते गावापर्यंत १२ कोटी ५० लाख रुपये खर्चाच्या पाच किलोमीटर सिमेंट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. भाजप नेते सुनील गुंड यांनी ऑईल कंपन्यांनी रोडलगत पथदिवे मंजूर करावेत, गावातील युवकांचे टँकर लावावेत, मनपा पाणी शुद्धिकरण केंद्राला ‘ना हरकत दाखला’ दिला जाईल. मात्र, रोडलगत गाळे बांधकाम करण्यास परवानगी देण्याची मागणी केली.
कार्यक्रमास इंडियन ऑईलचे श्रीनिवास कश्यापी, भारत पेट्रोलियमचे राहुल कुलकर्णी, हिंदुस्तान पेट्रोलियमचे तोटावर, उद्योगपती
माणिकलाल नरोटे, उपअभियंता प्रशांत महाजन, सरपंच शोभाताई गुंड, अंकुश अवताडे, शिवाजी यादव, नगरसेवक सुशीलकुमार क्षीरसागर, विशाल जाधव, माजी सरपंच शिवाजी पाटील, छावाचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, मुरारी शिंदे, रवीशंकर ढेपे, मीनाक्षी खांडेकर, शबाना मुलाणी, चंद्रकला शिंदे, किशोर गुंड, लक्ष्मण खांडेकर, अब्दुल मुलाणी, बाळासाहेब खांडेकर, कैलास हजारे, प्रकाश गुंड, हनुमंत हजारे, हरिश्चंद्र माने. दौलत शिंदे, संदीप चटके,
----विरोधकावर देशमुखांची टीका
मागील २५ वर्षांत जेवढा निधी आणला नाही त्यापेक्षा मी अधिक निधी मतदारसंघात आणला मात्र मी श्रेयासाठी काम करत नाही, अशी टीका विरोधकावर केली. तिऱ्हे येथील सीना नदीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पूल व बंधारा मंजूर केला आहे, विरोधक सांगतात निधी रद्द करून दाखवतो, हेच विरोधकाचे काम आहे, असा टोला देशमुख यांनी मारला.
----१०पाकणीफाटा
पाकणी फाटा ते गावापर्यंत सिमेंट रस्त्याच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी आमदार सुभाष देशमुख, सुनील गुंड, शोभाताई गुंड, ऑईल कंपन्यांचे अधिकारी