वळसंगच्या ऐतिहासिक विहीर सुशोभीकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:00 AM2021-02-20T05:00:46+5:302021-02-20T05:00:46+5:30
सोलापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग या गावामध्ये १९३७ साली भीमनगरमधील सर्व ...
सोलापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग या गावामध्ये १९३७ साली भीमनगरमधील सर्व समाज बांधवांच्या वतीने बांधण्यात आलेल्या विहिरीचे उद्घाटन झाले. तो परिसर सुशोभीकरणाच्या दृष्टिकोनातून गेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा सुरू असून, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली. या सुशोभीकरणासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
या विहिरीच्या सुशोभीकरणासाठी पाठपुरावा करणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे, जिल्हा परिषदेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी जी.एम. ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील, पक्षनेता अण्णाराव बाराचारे, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, शाखा अभियंता राजेश जगताप, पयावेळी जी.एम. ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील, पक्षनेता अण्णाराव बाराचारे, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, शाखा अभियंता राजेश जगताप उपस्थित होते.
त्यानंतर वळसंगमधील विहिरीच्या ठिकाणी प्रत्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्षांनी भेट दिली. विहीर परिसर सुशोभीकरणाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्षांनी त्यांना दिल्या. यावेळी भीमनगरातील नागरिकांच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वागत करण्यात आले.
प्रारंभी विहिरीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रकल्प अभियंता सज्जन भडकवाड, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गायकवाड, वंचित बहुजन आघाडी उस्मानाबादचे मिलिंद रोकडे, पप्पू गायकवाड, प्रकाश बनसोडे, अश्विन सोनवणे, भीमा मस्के, शांतकुमार गायकवाड, रवींद्र गायकवाड, अशोक वाघमारे, संजय गायकवाड, जयभीम वाघमारे, संतोष गायकवाड, वाघमारे, दीपक गायकवाड, शेटीबा गायकवाड उपस्थित होते.
-----
फोटो : १८ वळसंग
वळसंग येथील विहिरीची पाहणी करताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे. यावेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे, बाळासाहेब वाघमारे, शिवानंद पाटील, अण्णाराव बाराचारे, परमेश्वर राऊत, राजेश जगताप आदी.