हजारो भक्तांच्या उपस्थितीत रामानंद सरस्वती महाराजांवर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:27 AM2021-09-15T04:27:15+5:302021-09-15T04:27:15+5:30
यावेळी त्यांच्या पश्चात त्यांचे उत्तराधिकारी म्हणून स्वामी शिवचरणानंद सरस्वती महाराज यांना त्यांच्या गादीवर बसवून अभिषेक करण्यात आला. यावेळी राज्यातून ...
यावेळी त्यांच्या पश्चात त्यांचे उत्तराधिकारी म्हणून स्वामी शिवचरणानंद सरस्वती महाराज यांना त्यांच्या गादीवर बसवून अभिषेक करण्यात आला. यावेळी राज्यातून ५० हजाराच्या सुमारास भाविकांची उपस्थिती होती. महाराजांच्या अंत्यसंस्कार समाधीनंतरही दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली.
गेली ३६ वर्षांपासून त्यांनी अन्नग्रहण केलेले नव्हते. यादरम्यान केवळ दूध व विविध फलाहार यांचे त्यांनी सेवन केले. मागील काही वर्षी पंढरपूर येथे त्यांनी एक भव्य मठही उभारला आहे. यावेळी अनेक लाेकांना व वारकऱ्यांना अन्नदानाची साेय त्यांनी केलेली आहे. चिंचगाव टेकडी हा परिसर पर्यटनदृष्ट्या अत्यंत प्रेक्षणीय झालेला आहे. पंढरपूरला जाणाऱ्या अनेक दिंड्या येथे थांबतात. त्यांचे लाखाे भक्त आहेत. त्यांची निधन वार्ता समजताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. कोराेनाचा वाढता प्रभाव पाहता भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने मंगळवारी दुपारी हाेणारा अंत्यविधी साेहळा मंदिर प्रशासनाच्या वतीने सकाळी सात वाजण्याच्या आत उरकण्यात आला. यावेळी सत्संग आश्रम ट्रस्ट, ग्रामस्थ व पोलिसांनी अंत्यसंस्कार विधी व्यवस्थित पार पडावेत म्हणून परिश्रम घेतले.
...................
रामानंद महाराजांचा जीवनप्रास
रामानंद सरस्वती महाराज मूळचे उत्तर प्रदेश येथील रहिवासी होते. पंढरपूरला एका वारीनिमित्त आले होते. त्यानंतर चिंचगाव येथील उंच डोंगरासारखी टेकडी पाहून तेथे ते १९६२ साली ते महादेव टेकडीच्या डोंगराळ भागात वास्तव्यास आले हाेते. त्यावेळी तिथे लहान महादेव मंदिर हाेते. सन २००५ साली त्या मंदिराचा जीर्णोद्धार करून दगडात मोठे मंदिर व सभागृह बांधले. याचे नंतर त्यांनी ब दर्जाच्या तीर्थक्षेत्रात रूपांतर केलेले आहे. याचबरोबर यात्री निवासासह इतर माेठ्या सुखसुविधाही याठि काणी उपलब्ध केलेल्या आहेत. महाराजांना मराठी, इंग्रजी, हिंदी, तमिळ, कर्नाटकी यासारख्या एकूण सोळा भाषा लिहिता, वाचता येत होत्या.
............
अंधश्रद्धेला कधीही दिला नाही थारा
गेली ५९ वर्षांपासून ते चिंचगाव टेकडी येथे वास्तव्यास होते. नागपूर येथील तपकिरे महाराज यांच्या नावाने चिंचगाव ते पंढरपूर अशी पायी दिंडी त्यांच्या अधिपत्याखाली सुरू होती. दर पौर्णिमेस होणारा सत्संग सप्ताहही त्यांनीच सुरू केला आहे. मितभाषी असलेल्या रामानंद महाराजांनी अंधश्रद्धेला कधीही थारा दिला नाही. त्यांच्या वास्तव्यामुळे संपूर्ण परिसराला आध्यत्मिक क्षेत्राचा वारसा मिळाला होता.
.........
फोटो १४रामानंद महाराज
140921\img-20210914-wa0155.jpg
चिंचगाव टेकडी येथे प पू रामानंद सरस्वती महाराजांना समाधी देताना विधी करताना साधक व भाविक