दहावी, बारावीनंतर अविस MS-CIT सोबत फ्युचर वेध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:30 AM2021-06-16T04:30:00+5:302021-06-16T04:30:00+5:30
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) व इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ (आयपीएच), ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील अग्रगण्य संस्था अविस कॉम्प्युटर्स ...
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) व इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ (आयपीएच), ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील अग्रगण्य संस्था अविस कॉम्प्युटर्स येथे विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दिशा निश्चित करण्यासाठी ' फ्युचर वेध ' नावाने स्वतंत्र करिअर काैन्सिलिंग विभाग चालवला जातो. यामध्ये विद्यार्थ्यांची ऑनलाईन करिअर इंक्लिनेशन टेस्ट घेऊन पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या करिअर विषयी वैयक्तिक समुपदेशन केले जाते. विश्वविख्यात मानसोपचारतज्ज्ञ, अनेक पुस्तकांचे लेखक, करिअर मार्गदर्शक हे मार्गदर्शन करणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक आणि इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ, ठाणे या संस्थेचे संस्थापक डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शुभा थत्ते यांच्यासह डॉ. पूजा ठक्कर, डॉ. शर्मिला लोंढे, डॉ. कुसूम यादव व डॉ. प्राची चित्रे यांच्या टीमने तीन वर्षे अथक परिश्रम घेतले. सखोल संशोधनातून, देश विदेशातील हजारो विद्यार्थ्यांवर परीक्षण करून, अतिशय शास्त्रशुद्ध अशी मानस शास्त्रावर आधारित करिअर इंक्लिनेशन टेस्ट ही करिअर शोध चाचणी विकसित केली आहे. अविस कॉम्प्युटर्सचे संस्थापक अविनाश मठपती हे ' फ्युचर वेध ' उपक्रमासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे प्रमुख समुपदेशक व प्रशिक्षक म्हणून काम पहातात.
दहावी, बारावीच्या यावर्षी विद्यार्थ्यांच्या परीक्षा न झाल्यामुळे त्यांच्या अभ्यासाच्या प्रगतीबद्दल पालकांच्या मनात शंका आहेत. पुढील शिक्षणाचा कोणता पर्याय निवडावा याबद्दल संभ्रम आहेत. ' फ्युचर वेध ' उपक्रमात भाग घेऊन हा संभ्रम निश्चित दूर होईल. या शिवाय MS-CIT मधून संगणकाचे पायाभूत ज्ञान व भविष्यातील उच्च शिक्षण व नोकरीसाठी अत्यावश्यक प्रमाणपत्र मिळणार आहे.
MS-CIT व्यतिरिक्त अविस कॉम्प्युटर्समध्ये कॉम्प्युटर टायपिंग, टॅली, डिटिपी, सी प्रोग्रॅमिंग, ऑटोकॅड, ॲडव्हान्स्ड एक्सेल, वेब डिझायनिंग, हार्डवेअर, नेटवर्किंग, इ. अनेक कोर्सेस घेतले जातात. विविध मॅनेजमेंट व नोकरीसाठी उपयुक्त कोर्सेस जसे रिटेल मॅनेजमेंट, बँकिंग फायनांशिअल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स, इंग्लिश कम्युनिकेशन अँड सॉफ्ट स्किल्स असेही कोर्सेस येथे घेतले जातात.
- अविनाश मठपती
अविस कॉम्प्युटर्स, सोलापूर