गब्बर के शोले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 12:20 PM2019-10-02T12:20:59+5:302019-10-02T12:21:40+5:30

धाडसी निर्णय घेण्यात पारंगत असलेला हा गब्बरसिंग म्हणे विरोधकांचा जणू कर्दनकाळच.

Gabbar's Sholay! | गब्बर के शोले !

गब्बर के शोले !

Next

रविंद्र देशमुख

हा गब्बरसिंग हटके आहे. शोले सिनेमातल्या गब्बरसारखा क्रूरकर्मा नाही. राजकारणातला आहे हा गब्बर. त्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांची राजकीय शिकार करायला आवडतं त्याला .. फुलवाल्या राजकीय पक्षाचा हा प्रमुख सरदार असल्यामुळे त्याचा सर्वत्र दबदबा अन् बोलबाला आहे. धाडसी निर्णय घेण्यात पारंगत असलेला हा गब्बरसिंग म्हणे विरोधकांचा जणू कर्दनकाळच.

गब्बरसिंग आज काहीसा अस्वस्थ दिसत होता. नवी दिल्लीतील बंगल्याच्या हिरवळीवर हातातला पट्टा जमिनीवर आपटत येरझाºया मारत होता... महाराष्टÑाच्या निवडणुकीकडे त्याचं लक्ष होतं... यानिमित्ताने हातवाले, घड्याळवाल्यांचा पक्ष संपविण्याचा त्यानं विडाच उचलला होता.. आता त्याला हिशोब घ्यायचा होता. किती इनकमिंग झालं? ... गब्बरसिंगकडं आम्ही बारकाईनं पाहिलं. काय झालं म्हणून दूर उभ्या असलेल्या सांबाला आमच्या सोलापुरी हिंदीत विचारलं.. सांबा साहब, क्या हुआ सरदार को?.. चूप इधर - उधर घूम रहे है.. हम दिल्ली देखने आये थे सोचा सरदार को मिल लू?.. मगर सरदार हमारे तरफ देख भी नही रहे है!... सांबा आमच्याकडं बघून तडकलाच. एऽऽऽ एऽऽऽ कौन है रे तू? इधर क्या कर रहा है?. आम्ही एकदम घाबरून गेलो. भीत भीतच म्हणालो, नोटबूक - पेन लाया है हमने, सरदार की साईन लेनी हैं!.. 

सांबा आमचं बोलणं ऐकून अजूनच खवळला.. एऽऽ चल हट. सरदार राह देख रहे हैं. बंबई से लोग आने वाले हैं. तुमको नही मिल सकते...
काय करावं? आमचा नाईलाज झाला. आमच्या बरोबर आलेला दोस्त तर जाम सटकला. सोलापुरीच तो!.. म्हणाला, जाऊ दे यार, यान्ला कशाला भाव द्यायलास. उगं येळ घालवू नको. चल तिकडं चांदनी चौकात जाऊ. काय तर खरेदी करू. रात्री एखादा पिच्चर टाकू. चल, चल इथनं चल. दोस्ताच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करून आम्ही पुन्हा सांबाच्या जवळ गेलो अन् विचारलं, कौन आ रहा हैं मुंबई से?... गब्बर थोडा चालत चालत लांब गेल्याचं पाहून सांबानं उत्तर दिलं,‘ओ कोई पंत और दादा आ रहे हैं, उनके साथ और भी कुछ लोग है’... तुमको क्या करने का है? जाँव जाँव जाव दूर जाव, नही तो सरदार फटके मारेंगे.. सांबानं पुन्हा खवळून आम्हाला दूर लोटलं.. निमूटपणे आम्ही दूर जाऊन उभारण्याचं ठरवलं... इतक्यात समोरनं पंत, दादा अन् काही पुढारी येताना दिसले.

आमच्या राज्यातल्या नेत्यांना दिल्लीत पाहून दिल खूश झाला... जवळ जाऊन शेक हॅन्ड करण्याची इच्छा झाली.. पुढंही सरकलो; पण सांबाच्या करड्या नजरेला घाबरून पुन्हा तिथंच थांबलो... नेतेमंडळी जवळ येताच सांबा बंदूक सावरत त्यांच्या जवळ गेला. त्यांची तपासणी केली अन् थांबायला सांगितलं... सांबा खबर देण्यासाठी सरदारांजवळ आला. सरदार, बंबई से लोग आये हुए हैं.. सरदारनं सात मजली हास्य केलं. संपूर्ण नॉर्थ ब्लॉक दुमदुमून गेला...अरे ओ सांबा, कितने आदमी हैं? सरदारनं विचारलं... चार आदमी हैं सरदार, सांबानं सांगितलं... बुलाव उनको, मेरे सामने लाव.. हाँ सरदार म्हणत, सांबानं पंत, दादांना खुणेने बोलावून घेतलं... दोघं सरदारांपुढे आले.. सरदारांनी हातातला पट्टा जमिनीवर आपटत, विचारलं... कितने आदमी लाए?.. पंत म्हणाले, हमारे साथ और दो जन हैं सरदार!... नहीऽऽऽ पार्टी में कितने लोग लाए?...

सरदार, आपको बताने में खुशी होती है की, हातवाले और घड्याळवालों के सभी बडे आदमी लोगोंको अपने पार्टी में ले के आये है हम. आपने जो जैसे बताया, वैसाही किया है!.. ओ अकलूजवाले लोकसभा के टैमपेच आए थे. अभी वो पुरा जिला खाली हो गया है. कुछ अपने साथ आए और कुछ धनुषबाणवालों के पास गए!... सरदार, दाढीवर हात फिरवत फिरवत म्हणाले... और ओ ठाकूर का क्या हुवा... पंत म्हणाले, कौन ठाकूर सरदार?.... पंतांच्या या प्रश्नावर सरदार संतापले, हातातला पट्टा जमिनीवर आपटत म्हणाले, पंतऽऽ कैसा सवाल पुछते हो?.. वो घड्याळवाले बडे ठाकूर!... पंत चेहरा बारीक करून म्हणाले, सरदार, ओ ठाकूर हमारे बस की बात नही है सरदार... पंतांच्या बोलण्यावर सरदार थोडं काळजीत पडले अन् म्हणाले, ठीक है पंत, दादा, ओ ईडीवाले उनसे निपट लेंगे!... अभी तुम जा सकते हो!... सरदारांना प्रणाम करत सर्व मुंबैकर परतीच्या दिशेने निघाले... सांबाने पार्किंगमधली कार काढली अन् सरदार गाडीत बसून हरियाणाच्या मोहिमेवर निघाले.

Web Title: Gabbar's Sholay!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.