पंढरपूरच्या प्रांताधिकारीपदी अखेर गजानन गुरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:23 AM2021-09-19T04:23:36+5:302021-09-19T04:23:36+5:30

गजानन गुरव पंढरपूर येथे तहसीलदार असताना त्यांनी जानेवारी २०१४ ते जानेवारी २०१६ या कालावधीत कुळकायद्यांतर्गत कलम ४३ च्या शर्ती ...

Gajanan Gurav finally became the prefect of Pandharpur | पंढरपूरच्या प्रांताधिकारीपदी अखेर गजानन गुरव

पंढरपूरच्या प्रांताधिकारीपदी अखेर गजानन गुरव

googlenewsNext

गजानन गुरव पंढरपूर येथे तहसीलदार असताना त्यांनी जानेवारी २०१४ ते जानेवारी २०१६ या कालावधीत कुळकायद्यांतर्गत कलम ४३ च्या शर्ती विशेष शिबिरे भरवून सुमारे २५०० पेक्षा जास्त ७/१२ वरील शर्ती कमी केल्या आहेत. कोयना, कन्हेर, उजनी व इतर धरणग्रस्तांना जमीन वाटप होऊन १० वर्षे पूर्ण झालेल्या जमिनीच्या पुनर्वसनांतर्गत नवीन शर्ती शिबिरे भरवून कमी केल्या आहेत. यासह गारपीटबाधित शेतकऱ्यांना मदत वाटप, बाजीराव विहिरीचा जीर्णोद्धार, अतिक्रमणे काढून स्वच्छता, गोपाळपूर विष्णूपद येथील बंधारा दिवाणी कोर्टातील केस निकाली काढून अवघ्या तीन महिन्यांत पूर्ण केला. पंढरपूर तालुक्यातील ११ पुनर्वसित गावांना गावठाणांचा दर्जा दिला. आषाढी व कार्तिकी वारी कालावधीत हॅम रेडिओची सुविधा प्रशासकीय पातळीवर अमलात आणली. तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम व तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथे वारी कालावधीत आपत्कालीन मदत केंद्रांची (ईओसी) सुरुवात केली. त्यामुळे भाविकांना सुलभरीत्या एका ठिकाणी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

फोटो : गजानन गुरव

Web Title: Gajanan Gurav finally became the prefect of Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.