पावसाच्या सरी झेलत शेगावीचा राणा सोलापुरात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 04:00 AM2018-07-17T04:00:14+5:302018-07-17T04:00:32+5:30
टाळ मृदंगाच्या गजरात गण गण गणात बोते़़़ओम गजानऩ़़श्री गजानन असा जयघोष करीत, शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीने पावसाच्या सरी झेलत सोमवारी शहरात प्रवेश केला़
सोलापूर : टाळ मृदंगाच्या गजरात गण गण गणात बोते़़़ओम गजानऩ़़श्री गजानन असा जयघोष करीत, शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीने पावसाच्या सरी झेलत सोमवारी शहरात प्रवेश केला़ रुपाभवानी मंदिर परिसरात पाणी गिरणीजवळ महापौर शोभा बनशेट्टी यांनी पालखीे स्वागत केले़
रविवारचा उळे (ता़ उत्तर सोलापूर) येथील मुक्काम संपवून पालखी सकाळी १०़४५ वाजता पाणी गिरणी येथे आली. महापौरांनी गजानन महाराजांचे दर्शन घेतले़ तसेच पालखी सोबत आलेल्या वारकऱ्यांना लाडू वाटप करुन त्यांचे स्वागत केले़
यावेळी हजारो नागरिकांनी पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर पालखी तुळजापूरवेस रस्त्याने मार्गस्थ झाली़ कस्तुरबा मार्केट, सम्राट चौक मार्गे पालखी दुपारी १२ वाजता प्रभाकर महाराज मंदिरात दाखल झाली़ दुपारी २़३० वाजता सम्राट चौकातून बाळीवेस मार्गे टेलीफोन भवन, चाटी गल्ली, मार्गे कुचन प्रशालेत आगमन झाले़
>पालखी आज अब्दुलपूरकर मंगल कार्यालयात
कुचन प्रशालेतील मुक्काम संपवून पालखी मंगळवारी सकाळी ६ वाजता अब्दुलपूरकर मंगल कार्यालयाकडे मार्गस्थ होत आहे़ सकाळी ११ वाजेपर्यंत मंगलकार्यालयात पालखीचे स्वागत होणार आहे मंगळवार संपूर्ण दिवस मुक्काम येथेच असणार आहे़