सोलापूर जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीसाठी गण आरक्षण जाहीर, सोलापूर, बार्शी, करमाळा बाजार समितीचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:59 PM2018-01-22T12:59:38+5:302018-01-22T13:01:09+5:30
सोलापूर, बार्शी आणि करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी गणांच्या आरक्षणाची सोडत शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात काढण्यात आली.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २२ : सोलापूर, बार्शी आणि करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी गणांच्या आरक्षणाची सोडत शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात काढण्यात आली. सोलापूर बाजार समितीसाठी मार्डी, बोरामणी, बाळे, मुस्ती आणि मंद्रुप हे गण आरक्षित झाले आहेत.
बाजार समितीच्या निवडणुकीत १० गुंठ्यावर शेतजमीन असलेल्या शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. त्यानुसार प्रशासनाने १५ गणांची रचना जाहीर केली होती.
गणरचनेची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी एस. व्ही. धुमाळ आदी उपस्थित होते. प्रत्येक गणाच्या चिठ्ठ्या एका प्लास्टिकच्या डब्यात टाकण्यात आल्या. चार मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. तिन्ही बाजार समित्यांसाठी पाच गण आरक्षित झाले आहेत.
-----------
-सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती-महिला प्रवर्ग - मंद्रुप, बाळे, विमुक्त जाती/भटक्या जमाती - मार्डी,इतर मागास - मुस्ती, अनुसूचित जाती/जमाती - बोरामणी.
-बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती : महिला - पानगाव, पांगरी, विमुक्त जाती/भटक्या जमाती - उपळाई ठोंगे, इतर मागास - उक्कडगााव, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती - सासुरे
-करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती- महिला - उमरड, रावगाव,विमुक्त जाती/भटक्या जमाती - झरे, इतर मागास - जातेगाव, अनुसूचित जाती/जमाती - जिंती
-----------------
माजी पदाधिकाºयांचे गण खुले
उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज आणि पाकणी गण खुले आहेत. हिरज येथून माजी सभापती दिलीपराव माने निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव किंवा भंडारकवठे गण खुले राहिले आहेत. येथून माजी उपसभापती सुरेश हसापुरे निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. कणबस गण खुला असल्याने येथून माजी सभापती राजशेखर शिवदारे निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. मार्डी गण आरक्षित राहिल्याने भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, इंद्रजित पवार यांना इतर दुसरा मतदारसंघ शोधावा लागेल.