बचत गटांचा गणराय माळशिरसमध्ये विसावणार घरोघरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:26 AM2021-09-05T04:26:43+5:302021-09-05T04:26:43+5:30

माळशिरस : आर्थिक विकास महामंडळ सोलापूर व पंचायत समिती माळशिरस यांच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ महिला बचत भवन इमारतीत इको ...

Ganaray of self-help groups will rest in Malshiras from house to house | बचत गटांचा गणराय माळशिरसमध्ये विसावणार घरोघरी

बचत गटांचा गणराय माळशिरसमध्ये विसावणार घरोघरी

Next

माळशिरस : आर्थिक विकास महामंडळ सोलापूर व पंचायत समिती माळशिरस यांच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ महिला बचत भवन इमारतीत इको फ्रेंडली गणपती स्टॉल उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाले.

तालुक्यातील बचत गटांनी शाडू माती व विशेष नक्षीकला माध्यमातून इको फ्रेंडली गणपती तयार करून विक्रीसाठी खुले करण्यात आले आहेत. मूर्ती बनविणाऱ्या इस्लामपूर येथील गटांचा विशेष सन्मान करण्यात आला.

सीमेवरील जवानांसाठी राख्या तयार करून त्यांना राख्या पाठविल्याबद्दल शोभाताई तानाजी वाघमोडे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील, मिलिंद कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य मंगलताई वाघमोडे, सुनंदा फुले, सभापती शोभाताई साठे, उपसभापती प्रतापराव पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, गणपतराव वाघमोडे, लक्ष्मण पवार, हरिभाऊ मगर, सुरेश वाघमोडे, विष्णुपंत केमकर, राहुल वाघमोडे मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Ganaray of self-help groups will rest in Malshiras from house to house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.